सायटिका किंवा गृध्रसी Sciatica


सायटिका
वातविकारात ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. रस, रक्त, मांस
इत्यादी धातूचा क्षय झाल्यामुळे वात वाढतो. तसेच वाताच्या सर्व त-हेच्या कार्यात, स्त्रोतसातील अडथळ्यामुळे, वहनक्रिया बिघडून नवनवीन वातविकार उत्पन्न होतात.
सायटिका किंवा गृध्रसी हा विकार दस-या प्रकारात मोडतो.
शास्त्रकारांनी,
पाष्र्णि प्रत्यंगुलीनां या कंडरा मारुतार्दिता ।
सक्थ्युत्क्षेपं निगृहाति गृध्रसीं तां प्रचक्षते ।।
                                      अष्टांग हृदय नि. १५/६४
जरी एवढेच वर्णन केले असले तरी जेव्हा या विकाराच्या कळा,
तीव्र वेदना सुरू होतात तेव्हा काही बोलता सोय नाही इतका त्रास रोगी भोगतो.
तीव्र वेदनांच्या गृध्रसीस शास्त्रात खल्ली म्हणतात.
आगंतु कारणाप्रमाणेच, आमनिर्मिती हे एक प्रमुख कारण सायटिका विकारात आहे असा अनुभव आहे.
कारणे:
१) अग्निमांद्य असताना पचावयास जड, थंड, स्त्राव निर्माण करणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
२) अजीर्ण, अपचन, आमांश या विकारांचा पुन:पुन: प्रादुर्भाव होणे.
३) कोणत्यातरी एका पायाच्या पाठीखालच्या कमरेच्या भागावर अकारण ताण, आघात, जोर, मार यामुळे शीर दबणे.
४) मलावरोध, परसाकडे चिकट व दर्गंधी येणे, शौचास जोर करावा लागणे.
५) वेडीवाकडी बैठक, लोंबकळून उभे राहणे, स्कूटरची किक मारताना पाय सटकणे, दीर्घकाळ ताकदीच्या बाहेर वजन उचलणे, थंडी वा-यात भिजून श्रमाची कामे करणे,
लक्षणे:
१) प्रथमतः कंबरेपासून तीव्र वेदना, ताठणे सुरू होते.
२) क्रमाक्रमाने पाठ, मांड्या, पोटरी व शेवटी टाचेपर्यंत वेदना, ताठणे, कंप, टोचल्यासारखी पीडा सुरू होते.
३) किंचितही हालचाल सहन होत नाही.
४) मलावरोध, चिकट परसाकडे, भूक नसणे, अरूचि उत्पन्न होणे.
५) डोळ्यावर झापड येणे, तोंडाला पाणी सुटणे, अवयव जखडल्यासारखे वाटतात.
६) आमवातासारखी इतर लक्षणे होणे.
पथ्यापथ्य:
१) थंड, खूप जड, गोड, तेलकट, तुपकट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
२) पोटात वायू धरेल असे पदार्थ; शेव, भजी, चिवडा, डालडा, कलिंगड, काकडी, बटाटा, कोल्ड्रिंक, आइस्क्रीम कटाक्षाने टाळावेत.
३) वजन उचलणे, किक मारणे, जोरात धावणे, अवघडून बसणे, उभे राहणे, दीर्घकाळची बैठक कटाक्षाने टाळावी.
४) वज्रासनात बसावे, नंतर शवासन करावे.
५) कठीण अंथरूणच असावे. गादी नको. फळी झोपावयास असली तर उत्तमच,
६) गरम पाणीच प्यावे. त्यात सुंठ टाकून घेतल्यास अधिक चांगले.
७) नित्य एरंडेल, लसूण, आले, पुदिना, ओली हळद यांचा जेवणात समावेश करावा. जेवण ताजे गरम गरमच असावे.
८) जेवणानंतर ओवा, शोपा चावून खाव्यात.
९) अंगामध्ये गरम कपडे असावेत. गार हवा, ओल, पाऊसपाणी
यांचेपासून संरक्षण करावे.
१०) मागे वाकण्याचा व्यायाम फक्त करावा. याकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.


धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )