श्री ब्रह्मांडनायक आयुर्वेदिय व पंचकर्म चिकित्सालय

"Anywhere when a human being holds something else higher than his own personal well being suddenly that space is powerful and fantastic to be in"
_Sadhguru,isha foundation

आयुर्वेद हे शाश्वत शास्त्र आहे
व त्याचा पदोपदी प्रत्यय आयुर्वेदप्रेमी आपल्या चिकित्सा प्रयत्नात घेत असतोच.
आयुर्वेदाचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घेणे, औषधीकल्पांचा कार्यकारणभाव जाणून घेणे,
सफल व दुष्परिणामरहीत चिकित्सा करणे व त्यायोगे केवळ एतद्देशीयांचेच नव्हे तर अखिल
विश्वातील मानवांचे शारीर व मानस स्वास्थ्यरक्षण करणे हे सर्व निस्सम आयुर्वेद प्रेमींचे ध्येय !


स्वतः आयुर्वेदाचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून
वैद्य विजय पवार हे आयुर्वेद ग्रंथांचे वाचक व चाहते!
अनुभवाचे कण एकत्र आणावे व त्यांना सलग व
एकसंध असे रुप द्यावे, व्याधिंच्या चिकित्सेरुपी मांडावे ही त्यांची कळकळीची इच्छा।
अनेक वर्षांच्या ह्या इच्छेला एक साकार रुप आलं आहे.

||श्री ब्रह्मांडनायक आयुर्वेदिय व पंचकर्म चिकित्सालय||

''माझ्या रोगावर आयुर्वेदात काही आहे का?' असा प्रश्न रोगी
रोज विचारत असतात.
आयुर्वेद किती व्यापक तर्हेने वापरता येऊ शक्यतो त्याची झलक दाखविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
मला मिळालेली आयुर्वेदाच्या कामाची संधी
देवदुर्लभ आहे असे मी मानतो.
आम्हाला रुग्णपरिवाराचे मोठे
प्रेम पूर्वी लाभले आहे व आजही लाभत आहे.आयुर्वेदाच्या महासागरातील काही शिंपले माझ्या
हाती लागले. त्याचे प्रत्येकाचे मोती झाले असे मला वाटते."

- वैद्य विजय पवार
MD(आयुर्वेद)

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )