कंबर व गुडघेदुखी Back & Knee joint pain
आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीची दोनही शास्त्रे एकमेकांना पूरक!
या दोन्ही शास्त्रामुळे भारताची मान जगात ताठ राहिली आहे. अनेक विकारांचा यशस्वी
सामना या दोन शास्त्रांच्या समन्वयाने होऊ शकतो. कंबर, पाठ, मान
यांच्या सांध्यांच्या स्नायूंच्या व हाडांच्या विकारात औषधांबरोबरच
योगासनांची फार मौलिक मदत होते हे आम्ही नेहमीच अनुभवतो.
वयाच्या ठराविक मर्यादेनंतर कंबर दुखणे, गुडघे दुखणे,
सांधे दुखणे अशा तक्रारी सामान्यपणे ब-याच स्त्री-पुरुषांना त्रास
देतात. जसजशी माणसाची कृत्रिम राहणी वाढत जात आहे तसतसे या
विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.
स्त्रियांमध्ये याचा
प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
त्यातल्या त्यात स्थूल, बुटक्या स्त्रियांना
लवकर विकार जडतो. उठण्याबसण्याची सवय मोडणे,
फाजील पिष्टमय आहार ; चुकीचे औषधे बारीकसारीक तक्रारींकरिता घेणे असे अनेक
टाळता येण्यासारखे सोपे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. तसेच
लहानमोठ्या हाडांच्यामध्ये असलेल्या अतिकोमल चकत्यांवर किंवा
वंगणावर फाजील ताण दिला जातो. त्यामुळे उद्भवणाऱ्या तक्रारींवर
लगेच योग्य तो उपचार केला जात नाही व त्यामुळे रोग अधिकच
बळावतो. बॅवरॉन, प्रेडनीसॉल, ब्रुफेन, क्रोसिन इत्यादी गोळ्या घेऊन
तात्पुरता आराम व कायमची शरीराची हानी होते हे भल्या भल्या
डॉक्टर लोकांनाही माहित आहे. पण आपण रुग्णच तत्काळ ईलाज हवा असा आग्रह धरतो.
कारणे:
गुडघेदुखी :
१)गुडघ्याच्या साध्यातील व वाटीतील वंगण जास्त
हालचालींनी कमी होणे.
गुडघ्यांना ठराविक स्थितीत टांगल्यासारखे
सतत उभे राहावे लागणे.
२) उठबशीचे व्यायाम अतिरेकाने जास्त होणे
किंवा अजिबात त्या हालचालींची सवय सुटून जाणे
३) गुडघ्यांच्या बाजूवर, डोळ्यांवर, सुरुवातीची सूज आली असता त्याकडे दुर्लक्षकरणे.
४)खूप चालण्याचा व्यायाम केल्यानंतर पुरेशा विश्रांतीचा किंवा
मसाजचा अभाव, शरीरातील आवश्यक स्नेहाचा सार्वत्रिक अभाव,
म्हणजेच शरीर खूप रुक्ष होणे.
५)शौचास साफ न होणे, खाल्लेल्या
अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे आहार रसाला आमस्वरूप येऊन
आमवाताची लक्षणे दिसून येतात. मलप्रवृत्ती चिकट होणे.
कारणे:
कंबरदुखी :
१) सतत उरापोटी खूप ओझी वाहणे.
२) सतत उभ्याने काम करणे.
३) बसून, वाकून किंवा उठबस करून काम करण्याची सवय नसणे.
४) स्त्रियांचे बाबतीत पाळी साफ न येणे, अधिक बाळंतपणे
होणे,
५) गर्भाशयाचे अकाली शस्त्रकर्म, अंगावर पांढरे जाणे इ.
६) पाठीच्या मणक्यांमधील अंतर कमी जास्त होणे, तसेच त्या मणक्यामधील कोमल आवरणाच्या चकत्या सरकणे, जाडजूड गादयांवर झोपणे, दीर्घकाळ अवघडलेल्या स्थितीत बसणे,
रात्री गार जागी किंवा गारठ्यात झोपणे,
७) आमांश, संडासला साफ न होणे, पोटात गॅस धरणे.
लक्षणे:
गुडघेदुखी :
१) गुडघ्यातून कट्- कट् असा आवाज येणे.
२) जिना उतरताना जास्त त्रास होणे.
३) जिना चढताना त्रास होणे.
४) परसाकडे बसावयास त्रास होणे.
५)भरभर चालता न येणे.
६)गुडघ्यावर सूज येणे.
७)विशेषत: गुडघ्याच्या वाटीवर, डोळ्यांवर सूज येणे.
८)गुडघ्याची साधी हालचाल केली तरी सूज येणे, विश्रांती
घेतली असता बरे वाटणे.
लक्षणे:
कंबरदुखी:
१)उठाबसावयास त्रास होणे.
२) कंबरेच्या मध्यभागी दुखणे.
३) फार वेळ उभे राहता न येणे.
४)थोडे अधिक वजन उचलले असता त्रास होणे,
५)फळीवर उताणे झोपल्यास बरे वाटणे,
६)गादीवर झोपल्यास त्रास होणे,
७) वज्रासनात बसल्यास बरे वाटणे.
८) पायाला मुंग्या येणे,
९) विश्रांतीने बरे वाटणे.
१०) अशक्तपणा येणे,
११) स्त्रियांना पांढरे अंगावर जाण्याची सवय असणे.
१२) पुरुषांचा शुक्रधातू दुबळा होणे.
पथ्यापथ्य:
१) थंड पदार्थ कटाक्षाने टाळावेत. अकारण श्रम टाळावेत.
२) ताकदीच्या बाहेर वजन उचलणे, खूप जिने चढउतार करणे
टाळावे.
३) या विकारात हालचालीने बरे वाटते, अशा आमवातप्रधान
विकारात आवश्यक तेवढीच हालचाल करावी.
४) जेवणानंतर उकळलेल्या पाण्यात पाव चमचा सुंठ चूर्ण
मिसळून ते पाणी प्यावे.
५) संडास साफ होत नसल्यास एका चपातीच्या आटा किंवा
कणकेबरोबर एक चमचा एरंडेल तेल मोहन म्हणून मिसळून अशी
चपाती काही काळ घ्यावी.
६) आंबट, खारट, आंबवलेले पदार्थ, फ्रिजमधील पदार्थ, शिळे
अन्न, लोणचे, पापड, इडली डोसा पाव इत्यादी पदार्थ खाऊ नयेत.
७) पोटात गॅस धरेल असे खाणे पिणे, थंड पदार्थ टाळावे.
धन्यवाद!

Comments
Post a Comment