टॉन्सिल्स tonsils problems
टॉन्सिल्स हा अवयव मानवी शरीरातील पहिला गार्ड आहे.
घशांत व पुढे धुळ किंवा अन्य कोणतेही कण व कसलेच इन्फेक्शन उतरू नये; याची काळजी टॉन्सिल्स घेते. सर्दी, पडसे, घाण हवा,थंड पदार्थ शरीरांत मानवले नाहीत म्हणजे टॉन्सिल्सला सूज येते.
कान खराब होतो का नाही हेही टॉन्सिल्सवरून कळते.
हा अवयव काढून टाका हे सांगणे फार सोपे आहे. त्यामुळे
कांहीच्या पोटाची सोय होईल; पण बहुसंख्य मुलांची मूळ तक्रार
कायमच रहाते. टॉन्सिल्स काढल्यामुळे पुढे सुद्धा मुले सुधारत नाहीत.
कानाला इजा पोहोचण्याची शक्यता असेल, टॉन्सिल्स सेप्टिक
झालेल्या असतील व अन्य उपायांचा कांहीच उपयोग नाही अशी
खात्री असेल तरच टॉन्सिल्स काढून टाकाव्यात.
टॉन्सिल्स काढण्याकरिता नसून शरीर संरक्षणाकरिता आहेत,हा विचार सतत डोळया समोर हवा.
कारणे:
१) खूप थंड, गोड, आंबट खारट, कफ वाढविणारे
अभिष्यंदी (स्त्राव वाढविणारे) पदार्थ खाणे.
२) गार वारा, थंडी, पाऊस यांचा संपर्क शरीराला सहन
न होणे.
३) कांही ना काही कारणांनी लहान मुलांना सर्दी, पडसे
ताप नेहमी येत जाणे.
४) चुकून विषारी किंवा घशाला न मानवणारे पदार्थ खाणे.
५) अति बोलण्याचे श्रम व त्याबरोबर चहा, कोल्ड्रींक
यासारखे उलट सुलट गुणांचे पदार्थ घेणे.
६) आईस्क्रीम, कोल्ड्रींक, फुटसॅलड, बर्फ इत्यादिचा अतिरेकी ।
वापर.
७) खूप थंडी, वारा, पाऊस असताना घसा, कान, गळा यांचे संरक्षण न करणे.
लक्षणे:
१) घशातील टॉन्सिलच्या गाठींना सूज येणे.
२) गाठींचा क्षोभ होणे, सडणे.
३) ताप येणे व नेहमी बारीक ताप येणे.
४) बोलावयास त्रास होणे; आवाज बसणे.
५) घशात टोचणे; सर्दी, पडसे यांचा त्रास वाढणे.
६) दोन्ही टॉन्सिल्स व पडजीभ यांच्या त्रिकोणात्मक सुजे
मुळे गिळावयास त्रास होणे.
७) लहान मुलांची वाढ खुटणे, भूक मंद होणे.
८) कान दुखणे; कानाला इजा पोहोचणे; कान वहाणे.
पथ्यापथ्य:
१) थंड पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रींक, बर्फाचे पाणी
यासारख्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
२) तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नयेत.
३) सतत सर्दी, खोकला, ताप येत असेल तर त्याकरिता
आधी औषधे घ्यावीत.
४) ओली हळद, पुदीना, लसूण, आले हे पदार्थ जेवणात
असावेत.
५) तुळशीची दहा, दहा पाने सकाळ सायंकाळ चावून
खावीत.
६) घसा शेकत शेकत सोसवेल असे कोमट पाणी किंवा त्या स्वरुपाची पेये घ्यावीत.
धन्यवाद!
Comments
Post a Comment