अग्निमांद्य indigestion
आमचा मुलगा जेवत नाही.' ‘हिला भूक नाही.'' डॉक्टर,
काहीतरी औषध द्या, ही जेवेल असे करा.' अशा तक्रारी घेऊन
लहान मुलांचे आईवडील नित्य येत असतात.
तसेच हा मुलगा कितीतरी खातो, पण अंगीच लागत
नाही.' गेली कित्येक वर्षे मुलीचे वजन काही वाढत नाही. आहे
तसेच आहे.' अशा तक्रारी घेऊन येणारे आईवडील रोज भेटतात.
यांतील पहिला तक्रारींचा प्रकार सुसाध्य, दुसरा मात्र
कष्टसाध्य असतो. या प्रकारची लहान मुले, मुली वा मोठी माणसे
पाहिली, समोर आली की चिकित्सक मनाला चालना मिळते. अशा
शेकडो रुग्णांनी आम्हाला, विचाराला व कृतीला खाद्य पुरवून
ऋणांत ठेवले आहे.
अग्निमांद्य म्हणजे भूक नसणे हा सामान्य माणसाचा
दृष्टिकोण झाला. तो ढोबळ विचार झाला. शरीराने घेतलेल्या
आहाराचे, रस, रक्त, मांस इत्यादी धातूंमध्ये रूपांतर जेव्हा होत
नाही; तेव्हा अग्निमांद्य विकार म्हणता येईल. जराशी भूक मंद
झाली म्हणजे अग्निमांद्य म्हणू नये.
अग्नि हा पित्त या व्यापक शक्तीचा एक भाग आहे. मूळ शक्ती
पित्त. शरीरात असलेल्या त्याच्या स्थानामुळे जाठराग्नि हा शब्द
आलेला आहे. त्याचे मूळ काम पचन आहे. तो सतत जागता, पेटता ,संधुक्षित-राहिला पाहिजे. ज्याप्रमाणे शेगडी पेटवायला पुरेसे, इंधन, काड्यापेटी व फंकणी किंवा वारा घालण्याकरिता झडपणे
लागते तसेच अग्निमांद्य विकाराचे आहे.
कारणे
१) मुळीच न जेवणे, फाजील प्रमाणात जेवणे व पाणी
पिणे.
२) परस्परविरोधी गुणधर्माचे जेवण करणे.
३) संवयीचे नसलेले जेवणे.
४) खूप जड, थंड, रुक्ष शिळे अन्न खाणे.
५) जुलाब, उलटी याकरता चुकीची औषधे घेणे.
६) कारण नसताना औषधे घेणे.
७) परसाकडे, लघवी, ढेकरा, गॅस, यांचे वेग अडवणे.
८) कृमि, जंत, जुलाब, ताप, क्षय इत्यादी विकारांनी
जर्जर होणे.
९) ऋतुमान खराब असणे.
१०) ऋतु, काल, देश यांना साजेसे न वागणे.
११) अकारण चिंता, शोक वा भीती बाळगणे.
१२) समान वायु, पाचक पित्त व ग्रहणी या अवयवांचे कार्य
बिघडणे.
१३) कफ दोष वाढणे.
१४) व्यायामाचा अभाव.
लक्षणे
१) थोडेही अन्न खाल्ले असता ते न पचणे.
२) खाल्लेले अंगी न लागणे.
३) पोट जड वाटणे, पोट फुगणे.
४) आळस वाटणे, उत्साह नसणे.
५) पोटात वायु धरणे, करपट ढेकर येणे.
६) परसाकडे घाण वास मारणे, तोंडास दुर्गंधी.
७) मळ बांधून न होणे, चिकट किंवा शिथिल होणे.
८) झोप अस्वस्थ, चिडचिडेपणा वाढणे.
९) अजीर्ण नेहमी होणे.
१०) जीभ चिकट, पांढरी किंवा अस्वच्छ असणे.
पथ्यापथ्य
१) शक्य असल्यास उपचारांअगोदर पूर्ण लंघन करावे.
क्रमाक्रमाने अग्नीचे बल वाढेल तसा आहार वाढवावा. हा आहार
संसर्जन क्रम' या आयुर्वेदीय आहारपद्धतीप्रमाणे पेया, पातळपेज,
लापशी, पातळ मऊ भात, ज्वारीची भाकरी, मग जड पदार्थ
याप्रमाणे वाढवावा.
२) सुरुवातीला आहार कमी व फार पातळ नसलेला
घ्यावा.
३) जेवणात पाण्याचे प्रमाण कमी असावे.
४) जडान्न, तेलकट, तुपकट, मेवामिठाई, थंड, कोल्डूिक,
फ्रिजचे पाणी, अंडी, केक, बिस्किटे, या गोष्टी टाळाव्या.
५) योग्य प्रमाणात व्यायाम किंवा फिरणे म्हणजेच शरीराचे चलनवलन हवे.
६) शिळे जेवण, अवेळी किंवा उशिरा जेवण जेवू नये.
७) दही, मासे किंवा त्यासारखे स्राव निर्माण करणारे
पदार्थ खाऊ नयेत.
८) दुपारी झोंप, रात्री जागरण टाळावे.
९) मल, मूत्र, ढेकरा, गॅस इत्यादींचे वेग आवरू नयेत.
१०) नेहमीच्या आहारात गाईचे किंवा शेळीचे दुध, आले,
लसूण, पुदिना, लिंबू, कढीलिंब, मूग, पालेभाज्या,
दोडका, शेवगा, शपु, सुरण, दुध्याभोपळा, काले, पडबळ, ज्वारी, बाजरी यांची भाकरी, गव्हाचे फुलके, जुना तांदूळ असावा.
धन्यवाद!

Comments
Post a Comment