मलावरोध constipation

मलावरोध हा विकारच नव्हे, इथपासून तर हा सर्व विकारांचे मूळ आहे, विकार की विकारांचा मूळ!
अशा दोन टोकाच्या भूमिका तज्ञांमध्ये दिसून येतात. प्राण्यांचे सहज
निसर्गजीवन पाहिले; तर पहिला विचार बरोबर वाटतो. वैद्य डॉक्टरांकडे
कॉन्स्टीपेशन, मलावष्टंभ, मलावरोध, खडा होणे, शौचास साफ न होणे, खूप वेळ लागणे, दोन दोन दिवस परसाकडे न होणे, संडासला जावेसे न वाटणे,
जोर करावा लागणे, मलप्रवृत्ति चिकट असणे, आमांश, संडासला घाणवास मारणे, शौचाचे समाधान नसणे,
जेवणानंतर संडासला जायची भावना होणे, ग्रहणी अशा नानाविध मलासंबंधीच्या तक्रारींकरिता रुग्णांची गर्दी
असते. सद्य व सत्य परिस्थितीला सामोरे जावून, मलावरोधाची स्थूल कल्पना व पथ्यापथ्ये यांचा विचार या ब्लॉगपोस्ट मध्ये करीत आहोत.

कारणे:

१) वेळी अवेळी जेवणे.
२) जेवणावर पुन्हा जेवण.
३) भूक नसताना जेवण.
४) भुकेचे वेळेस पाणी पिणे.
५) पचावयास जड, थंड, तेलकट, तुपकट, खूप गोड, खूप
तिखट पदार्थ खाणे तसेच रुक्ष, शुष्क, खूप उष्ण पदार्थ खाणे.
६) गरजेपेक्षा खूप कमी जेवणे; कदन्न खाणे.
७) कारण नसताना लंघन करणे. वारंवार उपवास करणे.
८) तुरट पदार्थांचा अतिरेक.
९) तहान असताना पाणी न पिणे.
१०) रात्रौ दूध पिणे.
११) खराब पाणी व शिळे अन्न यांचे सेवन.
१२) चहा, कॉफी, मद्य, भांग, अफू अशी नशापाण्याची द्रव्ये
१३) पान, तंबाखू, विडी, सिगारेट, तपकीर, मशेरी यांचा वापर.१४) चुकीची औषधे व वारंवार रेचक घेणे(पेटसफा,कायमचूर्ण...
१५) व्यायामाचा अभाव, जागरण, दिवसा झोप, सुखासिनता, जास्त झोप, सतत काम, अतिमैथुन, अतिचिंता, वारंवार प्रवास, मल व मूत्र प्रवृत्ति अडविणे.
१६) बैठा व्यवसाय व भय.


लक्षणे:

१) मलावृत्तीस वेळ लागणे, जोर करावा लागणे. जोर करूनही पुरेशी मलप्रवृत्ति न होणे. समाधान न वाटणे.
२) खाल्लेच्या प्रमाणात पुरेसा मल न होणे, वारंवार जावे लागणे.
३) मलाचे स्वरूप चिकट, खडा भसरट असणे किंवा मलाला घाण वास येणे
४) मलामध्ये जंत, कृमी असणे.
५) काही खाऊ नये अशी इच्छा होणे किंवा खूप भूक लागणे.

६) शौचाचा वेग येणे, परंतु शौचास गेल्यावर नुसता वायू सरकणे
किंवा शेम पडणे.
७) मल अडकून गुदद्वाराशी कळ मारणे. मूळव्याधीची लक्षणे उत्पन्न होणे. रक्त पडणे.
८) पोट फुगणे, पोट डब्ब होणे, खालच्या पोटात वायु धरणे, अजीर्ण होणे
९) मलप्रवृत्ति जास्त होणे किंवा अडथळा होणे.
१०) चक्कर येणे, डोळे दुखणे, त्वचा निस्तेज होणे, अंगाला खाज
सुटणे, डोळे व लघवी पिवळी होणे.


पथ्यापथ्य:

१) वेळेवर व थोडी भूक ठेवून जेवावे. रात्री उशीरा जेवू नये, पोटात वायु असताना लंघन करू नये.
२) जेवणात तेलकट, तुपकट, जड, खूप थंड, खूप तिखट, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न कटाक्षाने टाळावे.
३) डालडा, चहा, मिरच्या, लोणची, पापड, धूम्रपान, मद्यपान, रात्रीचे जागरण, दुपारची झोप, उशीरा झोप, चिंता, मलमूत्राचे वेग अडविणे.
सुखासीन आयुष्य, सतत बैठे काम हे सर्व टाळावे.
४) रुक्ष, कठीण मल असणा-यांनी तूप व तेलाचे आहारातील प्रमाणवाढवावे.
चिकट मल असणा-यांनी, साखर, गहू, डालडा, तूप, दूध, थंड
पदार्थ वज्र्य करावेत.
जंत कृमी, कावीळ, ज्वर असणान्यांनी पाणी उकळून
प्यावे.
साखर, दूध घेऊ नये. कृश व्यक्तिंनी रेचके घेऊ नयेत.
५) आहार समतोल, सर्व रसात्मक असावा. रात्री जेवण कमी असावे.
मळांचे प्रमाण कमी असणा-यांनी मात्र भरपूर जेवावे. त्यांनी कडधान्ये भरपूर खावीत, इतरांनी कडधान्ये टाळावीत.
६) रात्री जेवणानंतर किमान अर्धा तास फिरून यावे. त्यामुळे पोटातील व डोक्यातील गॅस कमी होतो. मलावरोधाकरिता औषधे घ्यावी लागत नाहीत.
७) विडी, सिगारेट, दारु, मद्यपान, तंबाख, मशेरी इ. गोष्टी कटाक्षाने टाळाव्या .

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )