आमवात rheumatoid arthritis
याची सुरुवात चोर पावलाने हळूच होते. थंडी, गारठा, खूप पाऊस,अवघडून प्रवास अशा कोणत्यातरी कारणाने रोग एकदम शरीराचा एक एक भाग जखडावयास लागतो.
चुकीच्या औषध योजनेमुळे आम या रोगाकडे
दुर्लक्ष, उपचारांचा कंटाळा यामुळे हा रोग बळावतो व त्याला शरीरात घर करायला
; हात, पाय, गुडघे, कंबर, खांदा व सर्व शरीर मिळते.
अॅस्प्रिन असलेल्या वेदनाशामक औषधांनी या रोगाचे रुपांतर अधिक दुर्धर अशा
संधिवातात होण्यास वेळ लागत नाही.
कारणे :
१) अन्न अपक्क स्थितीत आमाशयांतून व पच्चमानाशयांतून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे जाणे हे प्रमुख कारण होय.
२) आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्तही आमस्वरुपी(विषस्वरूपी) बनते.
३) अशा अवस्थेत गारठा, ओल, खूप थंडी, पावसात भिजणे,
अवघडून बसणे यामुळे शरीरातील कोणताही सांधा वा भाग
आमवाताने जखडला जातो.
४) शौचास साफ न होणे, अवरोध करणे या कारणांनी हा रोग बळावतो.
५) जड़ान्न, मेवामिठाई, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक, जेवणावर जेवण,
फरसाण, शेव, भजी, चिवडा यांचा अतिरेक.
६) नेहमी बस वा रेल्वेच्या प्रवासात अवघडत बसावे लागणे.
७) दीर्घकाळ बारीक ताप येत राहणे.
लक्षणे:
१) संचारी वेदना म्हणजे शरीराच्या निरनिराळ्या भागात निरनिराळ्या वेळी दुःख असणे.
२) सुरुवातीच्या अवस्थेत सांध्याव्यतिरिक्तही भाग जखडला जाणे.(हाताची पायांची बोटे इ.)
३) सांध्यातून कट्कट् आवाज येईलच असे नाही.
४) परसाकडे चिकट होणे, साफ न होणे.
५) भूक मंद, जीभ चिकट, उत्साह नसणे.
६) शोथ म्हणजे सूज. ग्रह म्हणजे पकडणे व शूल म्हणजे वेदना; या
गोष्टी आज येथे तर उद्या तिथे असे घडणे.
७) गरम पाण्याने शेकल्यास बरे वाटणे.
८) तेल चोळल्याने काही वेळेस दुखणे वाढल्याचे लक्षात येते. त्याला
खरा आमवात संबोधावे.
९) ज्वर व छातीत डाव्या बाजूस दुखणे.
१०) सकाळी उठताना शरीर अतिजखडल्यासारखे वाटणे, हालचाल सुरू
झाली की बरे वाटणे.
पथ्यापथ्य:
१) जेवण नेहमी ताजे गरम गरम व आले, सुंठ, लसूण, मिरेयुक्त असावे.
२) सूर्यास्ताचे आत जेवावे.
३) थंड पदार्थ, दही, मासे यासारखे अभिष्यंदी पदार्थ, मीठ, लोणचे,
पापड, मेवामिठाई, फरसाण हे सर्व अवश्य टाळावे.
४) बैठे काम टाळता येत नसल्यास, अन्य वेळेस किमान व्यायाम
नियमितपणे करावा.
५) अंथरुण-पांघरूण, थंडीपावसाचे दिवसात जरुर उबदार असावे.
गादीपेक्षा फळी, दिवाण किंवा चटई, ब्लँकेट, कांबळे, शाल असे अंथरुण असावे
६) जेवताना गरम किंवा उकळून गार केलेले पाणी किंवा सुंठसिद्ध पाणी वापरावे
७) ओल, गारवा, जलाशय, गार वारे यापासून लांब रहावे.
८) नेहमी पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे.
९) रात्री कमी व लवकर जेवावे.
धन्यवाद!

Comments
Post a Comment