दाह Burning sensation
दाह म्हणजे आग होणे (हात, पाय, सर्वांग)
एका स्त्रीरुग्णाला नेहमी सर्वांगाची आग, उलटीची भावना
व छातीत ठरावीक जागी जळजळ अशी लक्षणे होती. पोटदुखी,
पोटफुगी व उलटीची भावना ही तीन लक्षणे असली तर लगेच
उलटीचे औषध द्यावे असे आयुर्वेदशास्त्र सांगते. त्यात खाज
व सर्वंगदाह ही दोन अधिक लक्षणे समाविष्ट करण्यात यावी,असो!
हातापायाची किंवा सर्वांगाची आग होणे हा म्हटले
तर साक्षात आगीशी खेळ आहे. या विकारात सुरुवात लहानशीच
असते. दुर्लक्ष व गैरसमजुतीमुळे चुकीचे उपचार यामुळे हा विकार
चटकन बरा होण्याऐवजी एकदम रौद्र स्वरूप धारण करतो. अग्नि
शमवणे जसे सोपे तसे भडकल्यावर त्याला आवरणे अवघड आहे.
हा पित्ताचा विकार असल्यामुळे जावयाच्या सन्मानाने व घृत
सारख्या बादशाही औषधाने या रोगाचे निरसन करावे लागते.
काही वेळेस महागातील महाग मोतीभस्मासारखी औषधे वापरावी
लागली तरी ती कमीच पडतात.
कारणे:
१) खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण, तीक्ष्ण गुणांचे पदार्थ
अधिक प्रमाणात खाणे.
२) सतत जागरण करणे, अधिक श्रम करणे, उन्हातान्हात
कोणतेही संरक्षण न घेता दीर्घकाळ काम करणे, अनवाणी चालणे,
डोक्यावर आच्छादन नसणे.
३) मिरच्या, लोणची, पापड, करडई, अंबाडी, चहा
मांसाहार, अंडी, जवस, तीळ, गूळ, काकवी, दारू, तंबाखू, सिगारेट ,खर्रा यांचे अतिरेकी सेवन.
४) कमी पाणी पिणे, आहारात स्निग्ध पदार्थाचा अभाव
असणे, अकारण उपवास करणे, राग राग करणे.
५) गरम पाण्याने सतत आंघोळ करणे, डोक्यावरून गरम
पाण्याने आंघोळ करणे.
६) डोकेदुखी, पोटदुखी, मूतखडा, पाळी पुढे मागे ढकलणे,
दाढदुखी, सर्दी, ताप, या विविध तक्रारीकरिता
शरीराला
न मानवणारी व शरीरात उष्णता वाढविणारी वेदनाशामक
अँस्प्रिन, सल्फा अशी विविध अपायकारक औषधे बराच काळ घेणे.
७) झोपेच्या गोळ्यांचा अतिरेकी वापर.
८) बिब्बा, लसूण, कुचला, बचनाग, रुई, धोत्रा, जायफळ
यासारख्या औषधी द्रव्यांचा न कळत चुकीचा वापर करणे.
९) अति प्रखर, ग्रीष्म व शरद ऋतूमध्ये अधिक ताण
पडणे व प्रखर उन्हाचा त्रास होणे.
लक्षणे :
१) हातापायाची, डोळयाची, लघवीची, त्वचेची आग
होणे.
२) जिभेचा शेंडा, योनी व लिंगाची आग होणे.
३) शरीर रुक्ष, कोरडे कोरडे वाटणे; अस्वस्थ वाटणे.
४) लघवी कमी व कष्टाने होणे.
५) तोंड कोरडे पडणे, पोटात आग पडणे, भगभग होणे.
६) थंड पदार्थ सारखे घ्यावेसे वाटणे.
७) ओली फडकी गुंडाळून बसावेसे वाटणे.
खळखळून लघवी झाल्यास किंवा चांगली व शांत झोप
लागल्यास बरे वाटणे.
९) तळहात, तळपायास भेगा किंवा चिरा पडणे, त्यातून
रक्त येणे.
१०) रांजणवाडी (डोळे येणे-stye eye)होणे.
११) मुखपाक(तोंडाला फोडे येणे), गुदपाक होणे.
१२) प्रत्यक्षात ताप नसणे पण अंग गरम लागणे.
पथ्यापथ्य:
१) कटाक्षाने तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ
टाळावेत.
२) जागरण, उन्हात हिंडणे, अतिश्रम, चिता, राग करणे,
या गोष्टी टाळाव्या.
३) चहा, तंबाखू, मद्य, मिरची, मसाला, मांसाहार, लसूण,
बिब्बा, अननस, पोपई, सुरण, जवस, करडई, आंबाडी, लिंबू
कैरी, चिंच हे पदार्थ टाळावेत.
४) दूधभोपळा, कोहळा, धने, कोथिंबीर, काकडी, मूग,
दूध, गोड ताक, ऊस, शहाळे, मनुका, द्राक्षे, मोसंबी, यांचा तारतम्याने वापर करावा.
५) ताप, सर्दी, पडसे याकरता उठसूट तीव्र औषधे घेऊ
नयेत.
धन्यवाद!

Comments
Post a Comment