अम्लपित्त Acidity
शहरी जीवनातील राहणीमुळे बऱ्याच लोकांना होणारा हा विकार
आहे. जेव्हा भूक असते तेव्हा जेवायचे नाही व जेव्हा भूक नसेल तेव्हा
अवाजवी व पुनः पुन्हा खावयाचे. यामुळे अम्लपित्त विकार बळावेल यात नवल ते काय?
हा विकार बऱ्याच वेळा
‘अल्सर' विकाराची पहिली पायरी असते. मोठमोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर,सतत काम करणारे एम्प्लॉयी यांना आपल्या आरोग्याकडे बघावयास वेळ नाही' अशी स्थिती असते.
त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर
आढळून येणारा हा खात्रीचा विकार असतो.
अम्लपित्त हा विकार म्हणून आपल्या शरीरात घर करायच्या
अगोदर त्याची चाहूल लागलेली असते. छातीत जळजळ, पोटात गॅस धरणे,
पोट फुगणे, तोंडाला पाणी सुटणे, क्वचित पोट दुखणे, पोट साफ नसणे,
मलावरोध, डोकेदुखी, उलटीची भावना, दात आंबणे या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले की अम्लपित्त विकाराचा शिक्का पक्का बसतो.
कारणे
१) खूप तिखट, आंबट, खारट पदार्थ खाणे, उदा. लोणचे, मिरची
मसाले, चहा, अंडी, मांसाहार, करडई, अंबाडी, गूळ, काकवी.
२) मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, जागरण, उन्हात हिंडणे,
३) सर्दी, ताप, दमा, खोकला याकरिता फार तीव्र औषधे घेणे.
४) चिंता करणे; मानसिक, बौद्धिक, आर्थिक ताण न झेपणे; खुप बोलावे लागणे, आंतडी पिळवटून ओरडणे, गाणे इ.
५) भूक लागलेली असताना भूक मारणे व नंतर भूक नसताना जेवणे.
जेवणाच्या वेळा अनियमित ठेवणे. रात्री उशिरा जेवणे.
६) सकाळी, दुपारी, सायंकाळीच्या जेवणाच्या वेळा फिरती किंवा शिफ्ट ड्युटीमुळे नेहमी बदलत्या राहणे. विकारात पेन
कीलर औषधांचा अतिरेकी वापर,
७) दमा, हृद्रोग, क्षय, दंत विकार, संधिवात, आमवात इ.
८) संडासचा वेग आलेला असताही अडवणे.
लक्षणे
१) घशाशी आंबट येणे.
२) छातीत जळजळणे आग होणे.
३) आंबट पित्त पडू पाहणे.
४) तोंडाला चुळा सुटणे.
५) अन्न उलटून पडणे.
६) पोट दुखणे.
७) डोके दुखणे.
८) परसाकडे साफ न होणे.
९) चक्कर येणे.
१०) हल्लक वाटणे.
११) अंगी न लागणे.
१२) पोटात वायू धरणे.
१३) दात सळसळणे व दाताला कंगोन्यासारखी झीज होणे.
१४) वजन घटणे.
१५) रक्ताचे प्रमाण घटणे.
१६) काम करण्याची इच्छा नसणे.
१७) हातापायांची आग होणे.
पथ्यापथ्य
१) थोडे व पुन: पुन्हा जेवणे. पोटात वायू धरणार नाही, पोट डब्ब होणार नाही
असा आहार ठेवावा.
२) जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात. म्हणजे पित्ताचे स्त्रावांना योग्यवेळी योग्य काम राहते.
३) मस्तीचे भरात खूप तिखट वा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. खूप मिसळ पदार्थ टाळावे.
४) तिखट, आंबट, तेलकट तसेच निरनिराळी व्यसने यांचेपासून लांब राहावे.
मेवामिठाई, डालडा, मिसळ कडधान्ये, पाव, बेकरीचे पदार्थ,फरसाण इ. टाळावे.
५) जागरण व उपवास व रात्रौ खूप उशिरा जेवण करू नये. पाणी किंवा फार पातळ पदार्थ शक्यतो टाळावे. तहान लागली तरच पाणी प्यावे.
६) आहारामध्ये आले, जिरे, धने, कोथिंबीर, आवळा, कोकम, दूध,
चांगले तूप, गोड ताक, साळीच्या, ज्वारीच्या व राजगिन्याच्या लाह्या
असा आहार ठेवावा.
७) चहा, धूम्रपान, मद्यपान, मशेरी, खर्रा,तंबाखू पूर्ण वर्ज करावी.
८) ज्वारीची भाकरी, दूध, जुन्या तांदुळाचा भात हा उत्तम आहार होय.
९) दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, कार्ले, परवल, टिंडा, घोसाळे,
कोथिंबीर, कोहळा, चाकवत, तांदुळजा, धने, मनुका, गोड द्राक्षे यांचा वापर करावा.
धन्यवाद!

Comments
Post a Comment