मधुमेह diabetes



मधुमेहासारख्या घोर विकारात,अनेकांच्या अॅलोपाथी सल्ल्याविरुद्ध जाऊन आयुर्वेद शास्त्रावर
पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही कार्य केले.
 कुपथ्य या सदराखाली, अनेक पदार्थाबरोबर अॅलोपॅथीच्या मधुमेह, ब्लड प्रेशर,थायराईड, कॅल्शियम, व्हिटॅमिन, पेनकिलर, वायसोलिन, दम्याचा पंप अशा विविध गोष्टी घ्यायला मनाई करतो.
 त्यामुळे आयुर्वेदीय औषधे घेऊन बरे वाटते का हे बघता येते.

आयुर्वेदाची चिकित्सा करावयाची, असे ठरविल्यावर चिकित्सा सुचते तशी आम्हाला सुचली.
तसाच मार्ग सर्वांना सुचावा ही वैद्य भगवान धन्वंतरीचरणी प्रार्थना.


मधुमेह हा एक छुपारुस्तम' आहे. शहरी व कृत्रिम राहणीचा हा
विकार, शरीर केव्हा कुठपर्यंत पोखरत जाईल याची भल्याभल्यांना,वैद्यकीय क्षेत्रांतील जाणत्या वैद्य-डॉक्टरांना कल्पना येत नाही.
मधुमेहाच्या व्यवहारातील सर्व परीक्षा नॉर्मल येत असूनही एकदम मधुमेह वाढतो; अर्धागाचा झटका येतो.
 हृदयाचा विकार बळावतो.
 एखादी मोठी जखम होऊन ती भरून येत नाही किंवा मृत्यू येतो.
याचे कारण मधुमेहाचे स्वरूप समजावून घेऊन शरीराला योग्य ते
टिकाऊ स्वरूपाचे बल देणारी औषधी योजना व पथ्यापथ्य दिले जात नाही.
अॅलोपॅथीच्या औषधांत रक्तशर्करा एकदम केव्हा खाली जाईल,
याची निश्चयाने खात्री देता येत नाही.
आयुर्वेदीय उपचारांत मधुमेहाचे नियंत्रण निश्चयाने होते, एवढेच नव्हे तर शरीराचे बल योग्य प्रकारे राखले जाते.
कारण या आयुर्वेदीय औषधांतील घटकद्रव्ये शरीरात लवकर   सात्म्य होतात.
ती निश्चितपणे निरुपद्रवी असतात.


कारणे:

१) आनुवंशिकता
२) कफवर्धक जड पदार्थ, पिष्टमय पदार्थ, साखर, गूळ, भात, गहू,
मीठ, डालडा, कडधान्ये, दही, फरसाण, पोहे, चुरमुरे, मेवामिठाई, बेकरी पदार्थ, मांसाहार यांचा अतिरेकी वापर, खूप पाणी पिणे, किमान हालचाल, व्यायाम न करणे, बैठे काम, मानसिक चिंता, कमी झोप किंवा खूप झोप, दुपारी झोप, रात्री जागरण.

३) शहरातील अतिशय कृत्रिम राहणी, तळपायाचा मातीशी कधीही संबंध न येणे.
४) शरीरांतून घामाच्या वाटे मलद्रव्य बाहेर पडण्यास अडथळा करणारे म्हणजेच कृत्रिम धाग्याचे कपडे वापरणे.
सतत पंखा किंवा वातानुकूलित व्यवस्था असलेल्या घरात वा कार्यालयात राहणे.


लक्षणे:

मधुमेहातील लक्षणांच्या अगोदर त्याची पूर्वसूचना देणारी लक्षणे
समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मधुमेहाला पहिल्या अवस्थेतच आळा घालणे, वाढू न देणे व बरा करणे किंवा ताब्यात ठेवणे सहज शक्य होते.

पूर्वसूचना सांगणारी लक्षणे :

खूप घाम येणे, अंगाला दुर्गंध येणे, शरीर शिथिल वाटणे, अंथरुणावर पडावेसे वाटणे किंवा खाली बसण्याची इच्छा होणे, झोप घ्यावीशी वाटणे, सुखी जीवन जगावेसे वाटणे, हृदय, डोळे, जीभ, कान यामध्ये मल साठणे; शरीर स्थूल वाटणे, केस, नखे यांची फाजील वाढ होणे,
थंड पदार्थाची आवड वाढणे, गळा व टाळू कोरडा होणे, तोंड गोड होणे,
हातापायाची आग होणे,
लघवीला मुंग्या लागणे, कपाळाला घाम येणे,
आवाज बसणे, लैंगिक दौर्बल्य,


प्रमुख लक्षणे:
१) प्रमाणाच्या बाहेर भरपूर व वारंवार लघवी होणे,
२) लघवीला घाण वास मारणे, लघवी खूप गढूळ होणे.
३) एका पायावर सूज येणे.
५) वरवर पाहता अकारण थकवा येणे,
४) चेहरा मलूल किंवा ओढलेला दिसणे किंवा अकारण तुकतुकीत दिसणे.
६) हातापायास मुंग्या येणे, अंगाला खाज सुटणे,
७) पोटच्या, पाय दुखणे, तोंडाला पाणी सुटणे.
८) इंद्रियांच्या तोंडाशी घाण मळ जमणे, ती संकुचित होणे.
९) पूर्वरूपात सागितलेली लक्षणे कमी अधिक प्रमाणात वाढणे.
१०) दृष्टी क्षीण होणे, हळूहळू दृष्टी क्षीण होणे.
११) तोंडावर वारे जाणे; जीभ, ओठ, गाल वाकडे होणे, अर्धागवाताची लक्षणे दिसणे.( अर्धांगवात यावरील ब्लॉग वाचवा)

पथ्यापथ्य:

१) पिष्टमय पदार्थ, गोड पदार्थ, दुपारी झोप, श्रमाशिवाय जेवण, आळस,सुखी व विलासी जीवन टाळावे.
२) भात, गहू, मीठ, मेवामिठाई, कडधान्ये, बटाटा, कांदा, मासे, मटण,अंडी, डालडा, कोल्डिंक, पोहे, चुरमुरे हे सर्व कटाक्षाने वर्ज करावे.
३) दूध, चपाती, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या उकडून, बिनमिठाच्या फळभाज्या, कारले, पडवळ, दुध्याभोपळा, दोडका, शेपूची भाजी, शेवगा,
सुरण, कोथिंबीर, लसूण, धने, जिरे, मूग, आवळा, हळद, पुदिना हे
पदार्थ आहारात ठेवावे.
४) शरीरातून भरपूर घाम निघेल इतपत व्यायाम, काम किंवा श्रम असावे.
बैठे काम टाळावे.
५) रात्री लवकर जेवावे. लगेच झोपू नये.
६) मानसिक चिंता करू नये. दैनंदिन जीवनात निर्माण होणा-या प्रश्नांवर
फार खोलवर विचार करून मनाचे संतुलन बिघडवू नये.
७) सूर्यनमस्कार, प्राणायाम, दीर्घश्वसन करावे.
८) आहारात कडू पदार्थांचा वापर जरूर असावा,
(उदा. गव्हाची चपाती खावयाची असल्यास एका पोळीच्या कणकेबरोबर
एक चमचा मेथीपूड मिसळून अशा पोळ्या कराव्यात.)

धन्यवाद!




Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )