चक्कर येणे Gidiness

चक्कर येणे हा एक मोठे धोकादायक आहे. या लक्षणामुळे
तो कधी कुठे पडेल त्याला लागेल किंवा हातपाय मोडेल? हे सांगता येत नसते.
चक्कर येणे याचा अर्थ इथे पित्तामुळे किंवा मेंदूला
रक्तपुरवठा पुरेसा न झाल्यामुळे फेकल्यासारखे व गळल्यासारखे होणे,
एवढा अर्थ घेतला आहे. फीटस् किंवा फेफरे यामुळे येणारी चक्कर
या ब्लॉग मध्ये विचारात घेतलेली नाही.


कारणे:

१) मानेच्या मणक्यामधील अंतर कमी अधिक होणे.
२) त्यामुळे त्यातील जाणाच्या रक्तवाहिन्या दबल्या जाऊन मेंदूला
रक्तपुरवठा न होणे.
३) अति विचार, झोप कमी, पोषण कमी यामुळे रक्ताची उत्तमांगाला
म्हणजे डोक्याकडे गरज वाढूनही प्रत्यक्षात रक्तपुरवठा मूळात कमी असणे.
४) रक्तदाबक्षय, खूप मोठी उशी घेणे, तीव्र ताप दीर्घकाळ राहणे.
५) शरीरात बनणाच्या आहाररसाचे प्रमाण कमी होणे, रसक्षय होणे.

लक्षणे:

१) डोलल्यासारखे वाटणे.
२) तोल जाणे.
३) डोळे मिटून दोन्ही पाय जुळवून घेऊन आधाराशिवाय उभे राहिल्यास पडेल की काय असे वाटणे, त्यावेळेस डोळ्याच्या पापण्या फडफडणे.
४) फेकल्यासारखे होणे.
५) भान जाणे.
६) बसल्या बसल्या किंवा उठता बसता किंवा चालताना क्षणभर
एकदम ‘ब्लँक' म्हणजे काळोखी आल्यासारखे वाटणे.
७) झोप कमी येणे.
८) तीव्र झोप येणे, एकूण सहनशक्ति कमी होणे.
९) हाताच्या बोटांना मुंग्या येणे.
१०) मानेवर, पाठीवर सूज येणे.

पथ्यापथ्य :

१) तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ वर्ज करावेत.
२) उपवास, उशीरा जेवण दोन्हीही टाळावे.
३) जागरण, चिंता, शोक, वादविवाद अजिबात करू नये.
४) लोणचे, मिरची, पापड, मांसाहार, दारू, तंबाखू, चहाचा अतिरेक
या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
५) जेवणात दूध, तूप, साखर, गहू, मूग, फळे असे पदार्थ आवर्जून
असावेत.
६) कोहळा, गाजर, आवळा यांचे पाक आलटून पालटून करून खावेत.
नारळाचे पाणी, ओले खोबरे, खजूर, अंजिर, मनुका यांचा आहारात समावेश असावा.

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )