हृद्रोग heart disease
यावरील
उपचार म्हणजे गंमत नव्हे . परंतु स्वतःला या पासना दूर ठेवणे हे आपल्या हाती आहेच !
कारणे :
१) अकाली, भूक नसताना अति खाणे
२) अति स्निग्ध, थंड, जड, चमचमीत पदार्थ नेहमी खाणे.
३) अति व्यायाम, चिंता, शोक, धावपळ करणे.
४) वरचेवर मानसिक त्रास होणे.
५) मलमूत्र प्रवृत्तीस वेळेवर न जाणे. वेग आला
असतानाही रोखून धरणे.
६) इतर विकारांसाठी किंवा स्वास्थ्यासाठी जुलाब किंवा
उलटीच्या औषधांचा अति वापर करणे.
७) कृमींचा इतिहास असणे.
८) अति कष्ट करणे, अति जड ओझे उचलणे.
९) छातीवर मार लागणे.
१०) इतर विकारांचा हृदयावर परिणाम होणे.
११) निरनिराळी व्यसने.
लक्षणे :
१) छातीत डाव्या बाजूस ठराविक ठिकाणी वरचेवर दुखणे,
पायावर सायंकाळी सूज येणे.
विश्रांती असल्यास सूज नसणे.
२) धडधडणे, कपाळावर घाम येणे.
३) हातात चमका, मुंग्या येणे.
४) खूप घाम येणे, जीव घाबरा होणे, काही करू नयेसे
वाटणे.
५) एकदम खूप थकवा येणे, पांडुता येणे.
६) चक्कर येणे, श्वासाला त्रास होणे, कानात आवाज
येणे,
७) उलटी होणे, अंग काळे निळे होणे.
८) चढ चढणे, जिना चढणे, फार श्रम याने धाप लागणे.
९) झोप खंडित होणे, डोके खूप दुखणे.
१०) वरचेवर ताप येणे व तो दीर्घकाळ टिकणे.
११) घुसमटल्यासारखे वाटणे, अंग गरम वाटणे.
पथ्यापथ्य:
१) तेलकट, तुपकट, आंबट, खूप तीक्ष्ण, उष्ण असे पदार्थ
टाळावेत.
चरबी वाढेल असा आहार घेऊ नये.
पचावयास हलका आहार घ्यावा.
अळणी आहार घ्यावा व वेळेवर जेवावे.
५) अधुनमधून लंघन करावे.
६) उलटी व जुलाबाचे औषध वरचेवर घेऊ नये.
दक्षता:
१) पूर्ण विश्रांती घ्यावी, धावपळ, दगदग करू नये. ओझे उचलू नये.
३) दम लागणे, चक्कर येणे, डोके जड होणे, खूप घाम
येणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसू लागल्यावर
लगेच तज्ज्ञ डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घ्यावा.
४) वजन वाढू देऊ नये.
५) लघवी, परसाकडे वेळेवर जावे.
६) मानसिक त्रास करून घेऊ नये. आनंदी वातावरणात
रहावे.
७) जंत, कृमी असतील तर त्याकरिता औषध घ्यावे, पण
इतर आजाराकरिता माहित नसताना उगीच औषधे
घेऊ नये.
धन्यवाद!
Comments
Post a Comment