कंडू itching खाज येणे

कंडू
या विकाराला लहान, वय, स्थळ, काळ यांचे काहीच
बंधन नाही. अंगाला कंड सुटली असता त्याचेवर विजय मिळविणे
फार अवघड काम आहे. ब-याच वेळा कामात असताना कंड सुटत नाही पण रिकामा वेळ फावला की तो रोग दुप्पट उसळी घेऊन त्रास देतो.
कंड ही चोरपावलाने सावकाश येते. वेळेवर योग्य उपचार झाले
तर लवकर जाते. नेमके कारण व त्याकरिता पथ्य पाळणे याची नितांत गरज असते.
दीर्घकाळची कंड जावयास दीर्घकाळची औषधयोजना व
मनोनिग्रह आवश्यक आहे. तात्कालिक कंड किंवा आगंतुक कंड बहुधा चटकन जाते. उदा. कावीळ, ताप, इत्यादि. मात्र मधुमेह, कुष्ठविकार,यातील कंड हे लक्षण बराच काळ मुक्काम करून राहते.
 कंड का आग हे सांगण्यामध्ये रोगी घोटाळा करत असतो. तसेच रोग्याचे नेमके लक्षण समजून घेण्यामध्ये आम्हा वैद्य डॉक्टर लोकांचाही घोटाळा असू शकतो.

कारणे:

(कोरफड, काँग्रेस गवत, नदीकाठचे गवत यांची खाज, खाजरा
सुरण कांदा, आळू यामुळे येणारी खाज, या विकारात कफ व पित्त या दोन दोषांचा संबंध असतो. बहुतांशी खाजेचा संबंध असलेले विकार कफप्रधान असतात. तुलनेने पित्ताचा भाग कमी असतो.)

१) कफ या दोषाची फाजील वाढ होणे.
२) कफाचे स्निग्ध, थंड, जडपणा, मंद, चिकटपणा, ओलावा, मृदूपणा व स्थूलपणा या गुणांची शरीरात वाढ होणे,
३) कफ व कफाचे वर सांगितलेले गुण कमी अधिक प्रमाणात वाढले असता मधुमेह, कावीळ, रक्तदाबवृद्धि, स्थौल्य, अजीर्ण, अपचन, कृमी हे विकार बळावणे.
४) खरूज, गजकर्ण, नायटा यासारख्या त्वचा विकारांना पोषक असे खाणेपिणे, आहारविहार किंवा अंथरुण व पांघरुण वा कपडे वापरणे.
५) महारोग, सोरायसिस (कफपित्तप्रधान महाकुष्ठ), कोड, शीतपित्ताच्या गांधी यासारखे भीषण किंवा दिसावयास लहान वा निरुपद्रवी विकार, मलावरोध, आमवात यामुळे चकंदळे उठणे
६) थड, मधुर, आंबट, खारट, पचावयास जड अशा आहाराचा
अधिक प्रमाणात वापर.
७) मीठ, लोणचे, पापड असा क्षारयुक्त आहार, दही, लिंब, चिंच,
कैरी असे आंबट पदार्थ; शेव, भजी, चिवडा, मिसळ, फरसाण,
मेवामिठाई, असे पचावयास जड पदार्थ नियमाने खाणे;

आईस्क्रिम, कोल्ड्रिंक, थंडपाणी, पंखा, वातानुकूल कार्यालयात
कामकाज यांचा अतिरेकी वापर. टेरिलिन, नायलॉन कपड्यांचा वापर, प्लॅस्टिक चपला, ऐषारामी, विलासी, बैठेकाम; व्यायाम न करणे,
झोप अधिक घेणे, दारू किंवा तंबाखूचे व्यसन इत्यादि.

८) क्षोभ होईल असे खूप तिखट पदार्थ खाणे, मांसाहार नियमित दीर्घकाळ करणे, झोप कमी घेणे या कारणांनी शरीरात उष्णता वाढून मग त्या शरीराला बाहेरचा गारवा लागणे.
९) त्वचा विकार झालेल्यांचे कपडे विशेषत: अंग पुसण्याची वापरणे.
घाम खूप येईल असे कपडे घालणे.
१०) केस कापण्याच्या वस्तू अस्वच्छ असल्यामुळे मानेवर नायटा
होणे व पसरणे.
११) पांडुता उत्पन्न होणे व रक्त व लघवीचे प्रमाण कमी होणे.
१२) योनीकंडू, गुदकंडू, केसातील खाज, अर्श.


लक्षणे:

१) कामात दंग असताना खाज न सुटणे, मात्र रिकाम्या वेळेस  खाज सुटणे.
२) सायंकाळी खाज सुटणे.
३) शरीरांत, पोटात उष्णता वाढून व त्यानंतर हवेमध्ये गारठा किंवा पंख्याखाली गार वारे लागून किंवा पावसात भिजून आल्यावर खाज सुटणे. खडखडीत ऊन पडले असता ही खाज सुटणे.
४) खरजेचे फोड पिवळे होऊन पू वाढल्यावर खाज सुटणे.
५) ओला किंवा कोरडा इसब यामध्ये खाज सुटणे.
६) नायटा या विकारात खाज सुटणे व खाजविल्यावर खूप बरे वाटणे.
७) पांडुता, कावीळ या विकारात अखंड खाज सुटणे व कावीळ कमी झाल्याशिवाय खाज कमी न होणे,
८) उन्हात हिंडून आल्यावर खाज सुटणे.
९) महारोग विकारात किंवा सोरायसिस या विकारांत विकार वाढल्यामुळे खाज सुटणे.
१०) मधुमेह विकारात कुपथ्य झाल्यामुळे खाज सुटणे.
११) रोग किंवा जखम बरी होताना सुटणारी खाज,
१२) रिअॅक्शन व फवारे यामुळे खाज,

पथ्यापथ्य:

१) आंबट, खारट व तिखट पदार्थ वज्र्य करावेत.
२) दही, लोणचे, मिरची, मीठ, चिंच, कैरी, लिंबू, पापड कटाक्षाने
करावे.
३) गार वारे, थंड पेये, वातानुकुल राहणी, तीक्ष्ण, उष्ण, मसालेदार
पदार्थ, मांसाहार वर्क्स करावा.
४) कफवर्धक आहार, जड पदार्थ, भूक नसताना जेवण, शिळे व गार अन्न, दारू, सिगारेट, तंबाखू वर्ज करावे.
५) दुपारची झोप, रात्रौ जागरण, ओलीच्या जागी रहाणे, गार फरशी, आळशी व विलासी जीवन, श्रम किंवा व्यायाम अजिबात न करणे या गोष्टी टाळाव्यात.
६) नायलॉन, टेरिलिन, प्लॅस्टिक, रबर यांचा वापर टाळावा,
७) स्ट्राँग औषधे कटाक्षाने टाळावी.



धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )