अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )

ख-या अर्थाने दुर्बल, कार्यहीन, निकामी
करणारा विकार, अर्धागवात येईपर्यंत तो टाळण्याकरिता बरेचसे करण्यासारखे असते.
तो येऊन गेल्यावर पुन्हा दुसरा वा तिसरा आघात होऊ नये म्हणून
कटाक्षाने प्रयत्न करावे लागतात.
अर्धांगवाताची कारणे आपला प्रभाव दाखवितात व बोलणे, चालणे, हातापायाची हालचाल यांवर आक्रमण
करतात.
त्यामुळे परावलंबित्व, परस्वाधीनता, पांगळेपणा, दुबळेपणा,हळवेपणा या सर्वांचा रोगी धनी होतो.
याकरिता चाळिशीचे आसपासच्या स्त्री-पुरुषांनी, विशेषत: स्थूल व्यक्तींनी आपली स्वत:ची व आपल्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे.
 एकदा अर्धांगाचा आघात झाल्यावर कुटुंबातील लोकांच्या हातात फक्त 'सेवाकार्य' हाच उपाय उरतो.


कारणे:

१) रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र या सात धातूंची झीज होण्यास कारण होईल असे खाणे, पिणे वा वागणे.
उदाहरणार्थ जेवणकमी व उशिरा करणे, कमी झोप घेणे, चिंता करणे इत्यादी.
२) सात धातूंच्यापैकी काही धातूचे फाजील पोषण होईल असे खाणे,पिणे वा वागणे. त्यामुळे शरीरातील वहनसंस्थांच्या कामात अडथळा येतो.

३) ताकदीच्या बाहेर काम करणे, मनावर सतत आघात होणे, मनात कुढणे, दु:खांना मोकळे होऊ न देणे, अति विचार करणे.

४) भात, मीठ, डालडा, साखर, तेलकट, तुपकट पदार्थ, मांसाहार, फरसाण यांचा अतिरेकी वापर.

५) सर्वात महत्त्वाची चार कारणे म्हणजे अतिस्थौल्य, रक्तदाब, मधुमेह व मेंदूवरचा फाजील ताण याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष.

लक्षणे:

पूर्वरूपे:
अर्धांगवाताचा झटका येण्याच्या अगोदर काही पूर्वसचना
मिळत असतात. त्यांचेवरून रोग्याने सावध होऊन पथ्यपाणी नीट
तर वातविकाराचा मोठा धोका टळू शकतो. आधुनिक तपासणीच्या रक्तदाब, रक्तशर्करा, हृदयालेख, यांच्या गरजेबद्दल दुमत नाही. पण त्याचबरोबर पूर्वरूपांची जाणीव ठेवणे व त्याप्रमाणे काळजी घेणे रुग्णाच्या हिताचेच आहे.

१) चक्कर (भ्रम)
२) थकवा (क्लम)
३) छातीत दुखणे (उर:शूल) विशेषतः डावे बाजूस
४) जडपणा (गौरव)
५) लठ्ठपणा (स्थौल्य)
६) मलावरोध
७) सार्वदेहिक धातुक्षीणता
८) झोप नसणे (अनिद्रा)
९) घाम येणे (अतिस्वेदप्रवृत्ती)

अर्धागवाताचा झटका येऊन गेल्यावर एक बाजू लुळी पडते.
हातापायाच्या स्नायूवरील नियंत्रण दूर होते. हातपाय त्यांचे हालचालीच
काम करू शकत नाहीत. गाल, जीभ, बोलणे, रुची यावर परिणाम होतो.
बोलता येत नाही किंवा बोलणे समजत नाही, तोंड वाकडे होते. रुग्ण दीनवाणा होतो.

हा झटका येण्याअगोदर काही वेळेस फक्त चेह-यावर ‘अर्दित'
म्हणजे चेह-याचा अर्धागवात असा आघात होतो.
 अर्धांगवात व अर्दित
यांची कारणपरंपरा बरीचशी एक आहे.
 अर्दिताचे वर्णन म्हणजे “अर्धागवात प्राणावर बेतला पण शेपटीवर निभावला' असे म्हणता येईल.
अर्धागवात विकारात मलमूत्राचा अवरोध, मधुमेहाचा प्रादुर्भाव व
वृद्धी, तसेच हृदय कमजोर असणे ही कमीअधिक प्रमाणात लक्षणे दिसून येतात.
यातील काही लक्षणे अर्धागवाताचा झटका गेल्यावर कमी होतात.
रोगी बलवान असल्यास अर्धागवात विकारात पहिल्या वेगात रोगी बरा होतो. त्याला कारण निसर्ग होय. ज्या स्नायूंचे बंधन सुटलेले असते
ते काही कालावधीत पुन: पूर्ववत होऊ शकतात.

पथ्यापथ्य:

खूप खाऊन व सुखासीन आयुष्य जगल्यामुळे शरीरात फाजील चरबी
वाढल्याचा इतिहास या विकारात असल्यास वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारविहार असावा.
गोडधोड पदार्थ, तेलकट, फरसाण, पिष्टमय पदार्थ, मीठ, डालडा, भात, मांसाहार हे पदार्थ टाळावेत.
सावकाश पण लांब अंतरावर फिरावयास जावे.
२) मानसिक कारणांनी अर्धागवात आलेला असल्यास मनाचा क्षोभ होईल असे आंबट, तिखट, खारट जेवण नसावे.
जेवण, विश्रांती, झोप हे वेळेवर व्हावे.
३) धातुक्षय, मन दुर्बल होणे, पांडुता ही लक्षणे असलेल्या अर्धागवात विकारात भरपूर खाणेपिणे, विशेषत: उडदाचे पदार्थ, कोहळा, तूप हे निर्धाकपणे घ्यावे.
शरीराचे आवश्यक तेवढे बृहण म्हणजे वजन वाढविणे
यावर लक्ष असावे.
४) अर्धांगवाताकरिता पुढील प्रकारे सात्त्विक आहार असावा.
गव्हाचा फुलका, मुगाची डाळ, दध्याभोपळा, दोडका, पडवळ,
कारले, शेवगा, सुरण, आवळा, चाकवत, राजगिरा, गाईचे दूध, गोडताक, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, करडईचे तेल, बिनवासाचे एरंडेल तेल इत्यादी.


धन्यवाद!


Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार