दमा asthma





दम्याने दमझाक झालेले दमेकरी सर्वांच्याच परिचयाचे आहेत.
तोंडाला रूमाल धरलेल्या जाहिराती आपण पाहतो. ऑक्सिजनचा
पंप, अॅस्थलिन, धोतन्याच्या विड्या, कनकासव, दमाकावळी, पिंपळी, धुरी, कोरफड, आश्विन पौर्णिमेला हैद्राबाद किंवा अंबरनाथ यासारख्या ठिकाणी दम्याचे औषध ; असे अनेक प्रकार दमाग्रस्तांच्या परिचयाचे आहेत.
जो सुचवेल तो तो उपाय माणसे करीत असतात.
श्वासविकार म्हणजे आपल्याला आपण घेत असलेल्या
श्वासाची जाणीव होणे. एरवी दर क्षणाला चालणारा श्वास आपल्या
नकळत चालू असतो.
 या ब्लॉगवर दमा म्हणजे शास्त्रातील 'तमक
श्वास' याचाच फक्त विचार आहे. शास्त्र क्षुद्र, तमक, महान इत्यादि
पाच श्वासाचे दम्याचे प्रकार सांगते. ज्या विकारात माणसाला
झोपावयास जमत नाही. उठून बसून रात्र काढावी लागते. कधी
दिवसाही दम्याचा अॅटॅक येतो. त्याचा विचार आपण करीत आहोत.

या प्रकारचा दमा हा ब-याच वेळा आनुवंशिक असतो.
कधी अॅलर्जीचा; कधी सर्दी पडसे, खोकला यामुळे; कधी खराब
वासामुळे, कमी अधिक श्रमाने अशी विविध कारणे दम्याची आहेत.
ब-याच जणांचा दमा बहुधा उत्तर रात्री येतो. पावसाळ्यांत ऋतुसंधीच्या
काळात जास्त जणांना त्रास होतो. पुढे पुढे मात्र उलट सुलटऔषधानी व कुपथ्याने तो केव्हाही चाळवतो, बळावतो.
दम्याच्या रोग्याने ठरविले तर पथ्यपाणी,
वेळेवर जेवण, दीर्घश्वसन व क्वचित् औषध यांमुळे दम्यावर जय
मिळविता येतो.


कारणे:

१) आनुवंशिकता
२) गार हवा, गारठा, गार वारे, थंडी, ढगाळ हवा, पावसाळा,
ऋतुसंधिकाल, अकाली गारठा, पावसात भिजणे,
३)सर्दीला, कफाला कारण मिळेल असे खाणे पिणे, उदा.
लस्सी, बर्फ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, दही टोमॅटो, केळी,
शिकरण, मासे, तेलकट पदार्थ इत्यादि.
४)रात्री उशिरा जेवण ; जेवणावर जेवण.
५) सर्दी, पडसे, ताप व खोकला यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष
करणे किंवा किरकोळ स्वरूपाकरिता घाईघाईने चुकीची
स्ट्राँग औषधे घेणे व नसलेला दमा ओढवून घेणे.
६) मलमूत्र, शिंका, सर्दी, पडसे, खोकला यांचे वेग अडविणे.
७) टायर, उदबत्त्या, धूळ, जुनी पुस्तके, रद्दी, घाण वास यांची
अॅलर्जी असणे.
८)बोलण्याचा सततचा व्यवसाय व ते श्रम ताकदीबाहेर होणे,
९)वातानुकूलित ऑफिसमध्ये सतत काम व घरी गरम किंवा
उकाड्याचे जागेत निवास अशी उलट सुलट राहणी.
१०) नाकाचे हाड किंवा मांस वाढणे.




लक्षणे:
१) श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे.
२) सर्दी, पडसे, शिंका, उचकी, ताप, खोकला यांपैकी
एक वा अनेक लक्षणे असणे.
३) थोड्याशा श्रमाने धाप लागणे.
४) आडवे झाले की श्वास सुरू होणे, उठून बसले की बरे
वाटणे.
५) काही वेळा बसले तरी श्वासाचा त्रास होणे.
६) काही कारण नसताना श्वास सुरू होणे.
७) पांडुता, दौर्बल्य, निद्रानाश,
८) क्षयविकारासारखी लक्षणे असणे,
९) आभाळ आले, उकडावयास लागले की त्रास होणे.
आकाश स्वच्छ, निरभ्र झाले की बरे वाटणे.
१०) वजन घटणे.



पथ्यापथ्य



१) सायंकाळी सूर्यास्ताअगोदर कटाक्षाने जेवण करावे.
२) जेवणांत आले, लसूण, पुदिना, ओली हळद अशी चटणी
अवश्य असावी.
३)पाणी उकळून गार करून प्यावे.
४)तुळशीची दहा दहा पाने सकाळी व सायंकाळी चघळून
खावीत.
५)सायंकाळचे जेवण हलके असावे. सकाळची न्याहरी थोडी
जास्त असावी. दुपारी एकदाच जेवावे.
६)थंड पाणी, केळे, दही, टोमॅटो, लोणचे, पापड, तेलकट व
फ्रीजमधील पदार्थ, शिळे पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
७) दुध्याभोपळा, सुरण, शेवगा, शेपू, दोडका, पडवळ, कारले,
या भाज्या जेवणात असाव्यात. रात्रौ दूध घेऊ नये. दुध
कधी घ्यावयाचे झाल्यास लसणाच्या पाकळ्या, दूध व
पाणी असे एकत्र आटवावे ते दूध प्यावे.
८) गारवा, वारे, ओल, घाण वास, उदबत्त्या, फटाके, टायर,
धूर, धूळ यांचेपासून लांब रहावे.
मद्यपान, मशेरी, तंबाखू, धूम्रपान पूर्ण वर्ण्य करावे.


धन्यवाद!








Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )