बालरोग
या ब्लॉग मध्ये बाल म्हणजे एक वर्षापर्यंत अशी आम्ही मर्यादा
घालून घेतली आहे. बालकाला पहिले चार-पाच महिने आईच्या किंवा
बाहेरच्या दुधावरच बहुधा ठेवले जाते. सात महिन्यापर्यंत म्हणजेच दात
यायला सुरुवात होईपर्यंत सहसा अन्न असे देत नाहीत. सातव्या महिन्यानंतर
पातळ पातळ पेज, क्वचित फळ असे दिले जाते. अशा एक वर्षाच्या
बालकाचा विचार करता; त्या काळात उद्भवणाच्या कफ, खोकला,
जुलाब, ताप, दाताच्या तक्रारी, दूधासंबंधी तक्रारी, पडसे, पोटदुखी यांचा
विचार या ब्लॉग मध्ये करीत आहोत.
लहानपणापासून लहान बालकांना शक्यतो औषधे देऊ नयेत.
द्यायचीच झाली तर कमीतकमी मात्रेने, गरजेपुरतीच द्यावीत. थोरथोर बालरोगतज्ञ जरी खूप टॉनिक सुचवत असली तरी; अशी औषधे टाळण्यात आपल्या बाळगोपाळांचे अंतिम हित आहे.
कारणे:
१) कफ -
सर्दी, पडसे, थंडीवारा, गारवा, ओल असलेल्या जागेत
राहणे; अशी कारणे घडणे. त्यावर वेळीच उपाययोजना न होणे, आईला कफ होणे.
२) खोकला -
सर्दी, पडसे, ओल, खराब हवा यांचा संपर्क सतत येणे,आईला खोकला होणे.
३) जुलाब -
आईच्या आहारात जड पदार्थ येणे. वरचे दूध व पाणी
हे जड किंवा खराब असणे, बालकाचा अग्नि मंद असणे.
४) ताप -
सर्दी, पडसे, खराब हवा, साथ अशी नेहमी तापाची कारणे
घडणे. बालकाचा अग्नि मंद असताना जबरदस्तीने दूध पाजणे.
५) दातांच्या तक्रारी-
दात अकाली येणे. आईचा मिथ्या आहार असणे.
विहार व त्यामुळे बालकाला आईचे दूध जड पडणे. बाहेरील दूध घट्ट असणे
६) दूधासंबंधी तक्रारी-
बालकाचे फुफ्फुस अशक्त असणे, छातीत कफ होणे. दूधामध्ये वारंवार बदल होणे.
७) सर्दी, पडसे -
सर्दीच्या नेहमीच्या कारणामुळे बालकाला किंवा
आईला त्रास होणे, हवेतील कमी-अधिक बदल, जागेतील ओल.
८) पोटदुखी-
भुकेपेक्षा जास्त किंवा अवेळी व सोसासोसाने दूध
पाजणे. दात येत असता अन्न अधिक प्रमाणावर देणे. बिस्किटासारखे पिष्टमय व पोटास उपद्रव देणारे पदार्थ बालकास भरविणे, दिवस दिवस परसाकडे न होणे.
लक्षणे:
१) कफ-
छातीत नाकात कफ होणे, बाहेर टाकता न येण्यामळे लानी
येऊन श्वासाला त्रास होणे. धाप लागणे.
२) खोकला-
कफामुळे किंवा साथीमुळे खोकला येणे,
३) जुलाब -
केवळ पातळ जुलाब, चोथापाणी, हिरव्या रंगाचे शेम
असलेले असे वेगवेगळ्या प्रकारचे शौचास वारंवार होणे. चेहरा म्लान होणे, पोट दुखणे, डोळे निस्तेज होणे.
४) ताप - अंग गरम राहण्यापासून तो एकदम तीव्र ताप येण्यापर्यंत तापाची विविध लक्षणे, अंगावर लाल फोड येणे, गोवर कांजिण्याचा ताप
असणे, थंडी वाजणे किंवा अंगाचा दाह होणे.
५) दातांच्या तक्रारी -
दात लवकर वर येणे किंवा खूप उशीरा येणे.
दात येताना जुलाब, हिरवे, शेम असलेले किंवा चोथापाणी शौचास होणे. ज्याला त्याला चावणे.
६) दुधासंबंधी तक्रारी -
अंगावरचे दूध ओढता न येणे, पोषण कमी
होणे. मुलाला भूक लागली आहे का? किंवा पोटभर दूध पिऊन झाले आहे का? याचा अंदाज न येणे, वरचे दूध न मानवणे, त्याने समाधान न होणे.
७) सर्दी, पडसे -
सर्दी, पडसे होणे, नाक वाहणे, चोंदणे.
८) पोटदुखी-
पोट फुगणे, शौचास साफ न होणे, खडा होणे, भूक न
लागणे, दूध न घेणे. सतत रडणे, किरकिर करणे.
पथ्यापथ्य:
१) दूधात पाणी घालून उकळून पातळ करून पाजावे.
२) बाहेरचे दूध वारंवार बदलू नये.
३) एकच प्रकारचे दूध गाईचे, म्हशीचे किंवा डब्यातील असावे.
४) चॉकलेट, बिस्कीट, खारी, गोळ्या, चहा हे सर्व कटाक्षाने टाळावे.
५) बाहेरचे अन्न द्यावयाचे झाल्यास पेज किंवा खूप पातळ भात द्यावा.
त्याच्यात जिरे, ओवा, सुंठ असे पदार्थ माफक प्रमाणात असावेत.
६) आंघोळीचे वेळेस गारवा लागणार नाही व आंघोळ चटकन आवरेल अशी व्यवस्था असावी. कपडे ऊबदार असावेत.
धन्यवाद!
Comments
Post a Comment