डोळ्यांचे विकार
सगळीकडे 'टाईट कंपार्टमेंट सारखे शरीराचे
स्पेशालिस्ट आहेत. डोळा-आय स्पेशालिस्ट, कान-इ.एन्.टी.
स्पेशालिस्ट. डोळा, कान, दात हे सर्व एका शरीराचे अवयव आहेत हे मोठमोठे ज्ञानी लोक विसरतात, तेव्हा अचंबा वाटतो.
रोगी डोळ्याच्या डॉक्टरकडे जातात. तेही डोळ्यांत टाकावयास औषधे व पोटात अॅन्टीबायोटिक्स देत राहतात.
डोळा म्हणजे नुसता कॅमेरा नव्हे. डोळा हा सर्व धातूंचे सार
आहे, अशी आयुर्वेदाची धारणा आहे.
ह्रस्व दृष्टीकरिता चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स हे सर्व तंत्रज्ञानाचे काम झाले.
पण नेत्रसंबंधी विकारांचा मुलभूत विचार आयुर्वेदात आहे, हे आम्ही वैद्यसुद्धा पार विसरून गेलो आहोत.
डोळा म्हणजे तेजतत्व. त्याला धोका कफापासून आहे.
या मुलभूत गोष्टी विसरून चालणारच नाहीत.
सोबत डोळ्याची लाली, खुपच्या, खाज, रांजणवाडी, पाणी येणे, डोळे येणे, हस्वदृष्टी वाढणे, मोतीबिंदू, फूल पडणे या मर्यादित विषयापुरतीच चर्चा या ब्लॉग मध्ये केलेली आहे.
कारणे
(१) डोळ्यांची लाली:
१) जागरण, उन्हांत हिंडणे, डोळे चोळणे,
रडणे, चिंता, फार काळ काम करणे.
२) खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण पदार्थ खाणे.
३) चहा, दही, मिरच्या, मांसाहार, दारु, सिगारेट,
तंबाखू यांचा अतिरेक.
(२) खुपच्या, खाज व पू
१) थंड, शिळे, आंबट, खारट जास्त
खाणे,
२) गार वारे लागणे, सर्दी, ताप,
३) शौचास साफ न होणे,
४) जागरण, अतिश्रम,
(३) रांजणवाडी
१) परसाकडे साफ न होणे.
२) उष्ण, गरम,तिखट, आंबट, खारट, मांसाहार यांचा अतिरेकी वापर.
(४) पाणी येणे
१) वाचनाचा व बघण्याचा ताण पडणे.
२) जागरण ,गार वारे, हवा, धूळ सहन न होणे.
३) तीव्र व घाण, वासाचे वायूमध्ये काम करणे.
४) शरीरातील मांसल भाग कमी होणे
व काम, चिंता यांचा ताण वाढणे,
(५) डोळे येणे
१) डोळ्यांची साथ असणे.
२) घाणेरडे कपडे,
रुमाल, टॉवेल, पंचा यांना डोळे पुसणे.
३) खराब वायूशी सतत
संपर्क येणे.
६) व्हस्वदृष्टी वाढणे
१) अनुवंशिकता
२) बारीक अक्षरांचे, कमी उजेडात झोपून किंवा वाहनांचे प्रवास करताना वाचन
३) अकाली दात काढणे
४) तीव्र उजेडात संरक्षणाशिवाय काम.
(७) मोतीबिंदू
१) पन्नाशीचे पुढे वय असणे, बारीक अक्षरांचे कमी
उजेडात वाचन.
२) मजारज्जूस काही कारणाने धा पोहोचणे.
(८) फूल पडणे
१) व्रण होणे
२) तापाच्या साथीत डोळ्यावर
सारा किंवा फूल येऊन तसेच कायमचे स्वरूप राहणे.
(९) दृष्टी क्षीणता
१) हळूहळू डोळ्यांनी कमी दिसावयास लागणे.
२) चष्म्याचा नंबर सारखा बदलणे.
लक्षणे:
(१) डोळ्यांना लाली येणे, आत सिरा लाल होणे, उजेड सहन न
होणे.
(२) डोळ्यांच्या कडांना बारीक मोहरीहून लहान फोड येणे, खाज
सुटणे, पापणीचे केस गळणे, पू येणे.
(३) डोळ्यांच्या कडांशी डाळीच्या दाण्याएवढी किंवा थोडी लहान
गाठ येणे, टोचणे, शौचास साफ न होणे. डोळ्याचे जास्त काम सहन न होणे,
(४) डोळ्यांतून सतत किंवा थांबून थांबून पाणी येणे,
(५) डोळे चिकटणे, लाल होणे, संसर्गाने दुस-या व्यक्तीला हाच
त्रास होणे.
(६) लांबचे न दिसणे, कमी दिसणे,
(७) डोळ्याच्या बुब्बुळावर पांढरे आवरण हळूहळू येणे,
सारवल्यासारखे दिसणे, चष्म्याचा नंबर सारखा बदलणे, काही
काळाने जवळची हाताची बोटेही न दिसणे
(८) डोळ्याचे बुब्बुळावर पांढरा ठिपका फुलासारखा येणे. दृष्टी
अजिबात जाणे किंवा थोडी जाणे.
(९) चष्म्याचा नंबर वाढणे.
(१०) डोळ्यात शुष्कता जाणवणे.
(११) डोळ्यांतून वारंवार चिपडे येणे.
(१२) अश्रू मार्ग बंद होणे.
(१३) डोळ्याचे खाली काळेपणा वाढणे.
पथ्यापथ्य:
(१) दही, मासे, लोणची, पापड, डालडा, मिसळ पदार्थ डोळ्याच्या दृष्टीने हितकारक नाही.
२) दुध्याभोपळा, कारले, पडवळ, दोडके, मद्य, गाईचे तूप, मूग,
कोथिंबीर, मनुका, गाईचे दूध हे डोळ्यांकरिता हितकर पदार्थ आहेत.
जव, गहू, साळी, साठेसाळी, डाळिंब, खडीसाखर, सैंधव, खूप
हिंडणाच्या प्राण्यांचे मांस, पावसाचे पाणी पिण्याकरिता हे हितकर होय.
३) धूळ, धूर, विषारी वायू, खूप ऊन, गार वारे, गरम भट्ट्या,
कोंदट हवा, जागरण किंवा अतिवाचन, अतिउजेड, अतिश्रम या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
४) वेगाचा अवरोध, अजीर्णावर जेवण, जेवणावर जेवण टाळावे.
https://uploads.documents.cimpress.io/v1/uploads/9e961f48-9aac-47aa-859f-5bfc3c39f532~110/original?tenant=vbu-digital
ReplyDelete