केसांचे विकार hair problems
केसांचे विकार हे खरे म्हणजे विकार नव्हेतच. केस पांढरे झाले.
गळावयास लागले, म्हणजे शरीरात काही कमी अधिक बिघडते असे नव्हे,
तरीपण तरुण मुलामुलींच्या दिसण्याच्या एका कल्पनेमुळे केसांना काही विलक्षण महत्त्व आजकालच्या वैद्यकात आले आहे.
केस लांबसडक भरपूर, काळेभोर असावेत अशी सर्व स्त्रियांची इच्छा असते.
तरुण मुलांनाही किंचित टक्कल पडणे किंवा एखादा केस पांढरा होणे हे उणेपणाचे लक्षण वाटते.
ब-याच वेळा शारीरिक कारणापेक्षा हवा, पाणी यांच्यातील अपायकारक भाग, हे केस गळणे किंवा पिकण्याला कारण असतात.
आहारातील असमतोल, चिंता व चुकीचे शांपू, तेल यांमुळेही केसांची 'केस' जिंकणे
म्हणजे वैद्यांची कसोटी लागत असते.
केसात कोंडा असताना डोक्याला तेल चोपडून केस गळणे कधीच थांबत नाही.
ज्यांना केस समस्येवर असरदार इलाज हवा आहे त्यांनी ‘डॅन्ड्रफ
खरबा किंवा सोरायसिस सारखी खपल्या, खवडे इ. लक्षणांवर लक्ष द्यावे.
कारणे:
(१) केस गळणे (टक्कल पडणे)
१) आनुवंशिकता
२) तीव्र व दीर्घ मुदतीचा ताप ।
३) चिंता ।
४) केस धुण्याकरिता साबणाचा अतिरेकी वापर ।
५) आंघोळीच्या पाण्यात दोष असणे, बोअरवेलचे पाणी,
६) खूप खारट आंबट पदार्थांचा जेवणांत नियमाने वापर
७) खवडे, कोंडा, उवा किंवा त्वचाविकार होणे.
८) चरबी वाढेल असे खाणे, पिणे.
९) काही कारणाने रक्ताभिसरण मंद होते.
१०) आंघोळीच्या पाण्यात जास्त क्लोरीन असणे.
११) शिर:शूल।
१२) केस ओढणे.
१३) सार्वदेहिक उष्णतेने केस गळणे.
१४) अत्यार्तव
(२) केस पिकणे :
१) मीठ जास्त प्रमाणात खाणे.
दीर्घकाळ व मोठ्या प्रमाणावर वापर जेवणामध्ये करणे.
२) आंबट पदार्थ, लोणची, पापड, चिंच, कैरी, लिंबू याचा
३) सातत्याने चिंता करीत राहणे.
४) मानसिक तीव्र स्वरूपाचा धक्का बसणे.
५) काही कारणाने रक्ताभिसरण मंद होणे.
६) असमतोल आहार
(३) केसात कोंडा, खवडे वा उवा होणे :
१) केस ओले राहणे.
२) डोके खसखसून न पुसणे.
३) अस्वच्छता ।
४) अस्वच्छ व्यक्तीच्या सहवासात बराच काळ येणे.
५) तीक्ष्ण, उष्ण, आंबट, खारट अशा पदार्थांचे जेवणांत प्राबल्य
असणे.
६) रक्त बिघडेल असे जेवणखाण किंवा वागणे असणे.
(४) चाई लागणे:
१) ही एक प्रकारची कीड अस्वच्छतेमुळे होते.
२) रक्ताभिसरण डोक्याच्या काही भागात कमी प्रमाणात होते.
३) केसांच्या मुळांचे पोषण करणारा रक्तपुरवठा तुटतो.
(५) केसांच्या मुळांशी उष्णता वाढणे
उष्ण, तीक्ष्ण, खारट, आंबट, तिखट पदार्थांचा अतिरेक, सतत
जागरण, राग, तीव्र ताप, उन्हात काम सतत करणे. या कारणांनी डोके गरम होते. केसांच्या मुळाशी उष्णता वाढते.
लक्षणे:
१) केस गळणे.
२) अकाली टक्कल पडणे.
३) केस पिकणे.
४) केस अकाली व तरुणपणी पिकणे.
५) केसात कोंडा होणे व खाज येणे,
६) उवा होणे व फोड येणे,
८) चाई लागणे,
७) केस राठ होणे.
९) डोके गरम लागणे.
१०) अशांत झोप.
पथ्यापथ्य:
१) केसांचे आरोग्याकरिता आंबट, खारट व तिखट पदार्थ टाळावेत.
२) फाजील चरबी वाढेल असे डालडासारखे पदार्थ वापरात नसावेत.
३) चिंता, जागरण टाळावे.
४) जेवणांत उडीद, मूग यांचा सालासकट वापर असावा.
५) दूध व सर्व त-हेचे सकस अन्न अवश्य खावे.
६) शिळे, निकृष्ट अन्न कटाक्षाने टाळावे.
७) स्त्रियांना उष्णतेमुळे किंवा अंगावर जास्त विटाळ जाण्यामुळे केसांचा विकार उद्भवल्यास वैद्यांच्या सल्ल्याने शतावरी कल्प पौष्टिक म्हणून खावा.
८) केसांच्या आरोग्याकरिता गार पाण्याची आंघोळ अतिशय चांगली, गरम पाण्याची आंघोळ केसांत खूप मळ झाल्यासच करावी.
९) पाव, इडली, डोसा, ढोकळा, लोणचे, पापड, दही, बेकरी पदार्थ, आंबवलेले पदार्थ, फरसाण कटाक्षाने वज्र्य करावे. आंघोळीचे अगोदर केश्यचूर्ण केस धुण्याकरिता वापरावे. साबण कटाक्षाने टाळावा.
१०) केसात कोंडा होणार नाही याची पक्की काळजी घ्यावी.
११) शंकास्पद पाणी, गढूळ पाणी, साचलेले पाणी किंवा खूप गर्दी असणाच्या तलावात आंघोळ करू नये.
धन्यवाद!
Comments
Post a Comment