फिटस् येणे
फिटस् म्हणजे अपस्मार किंवा एपिलिप्सी. अपस्मार म्हणजे
व्यपस्मृति, किंचित काळ स्मृती नाहीशी होणे, चक्कर आल्यावर त्या काळची काहीच आठवण रुग्णाला नसते. फक्त अशा विकारालाच अपस्मार म्हणावे.
फिट किंवा मिरगी किंवा झटका कसा आला? केव्हा
आला? किती काळ आला? या कशाचेच भान रुग्णाला नसते. काहीच आठवत नाही.
असे काही पहिल्यांदाच झाले की स्वाभाविक धावपळ होते.
कांदा हुंगणे, डॉक्टर बोलावणे, गार्डिनल गोळ्या देणे, इ.इ.जी., मेंदू तपासणी इत्यादि सर्व प्रयोग सुरू होतात, ब-याच वेळा लहानपणीच या विकाराची सुरुवात होते. पालकांच्या धास्ती व अतिकाळजी करण्याने डॉक्टर्स, स्पेशालिस्टस्, गार्डिनाल, मेझोटोल, डायलेटिन, इक्वानील अशा निरनिराळ्या बँडनेम असलेल्या भरपूर गोळ्या देतात.
या गोळ्या मेंदू झोपवण्याच्या असतात. झटका आल्याबरोबर प्रत्येक रुग्णाचीच दातखिळी बसणे, तोंडातून फेस येणे वगैरे गंभीर लक्षणे असतातच असे नाही, तेव्हा थोडा शांतपणे विचार करून कारणांचा विचार केला तर ‘फिट येणारा रोगी' हा कायमचा शिक्का बहुधा टळतो. झोपेच्या गोळ्यांचा
कायमचा बळी वाचतो.
कारणे:
(१) आनुवंशिक व पूर्वजन्मातील कर्म
(२) तीक्ष्ण, उष्ण, मनस्वी तिखट, आंबट आहार.
(३) ऊन लागणे, झोप कमी येणे, चिंता, शोक, खूप विचार करणे,
मनावर ताण पडणे ही सर्व लक्षणे एकामागोमाग एक घडणे.
(४) कृमी, जंत, मलावरोध, पोटात वायू धरणे.
(५) न आवडणारे पदार्थ खाणे, त्यामुळे उलटीसारखे वाटणे,
मळमळणे.
(६) मासिक पाळी वेळच्यावेळी व साफ न होणे.
(७) ग्रहबाधा, दृष्ट लागणे.
(८) भीती वाटणे, भयंकर असे दृश्य पाहून धसका बसणे, मन
कमकुवत होणे,
लक्षणे:
(१) बेशुद्धी क्षणभर ते तास अर्धा तास किंवा त्याहीपेक्षा जास्त
टिकणे.
(२) नुसतेच डोळे फिरवणे, क्षणभर बेसावध होणे.
(३) तोल जाणे, इतरांच्या आधाराची गरज पडणे.
(४) तोंडातून फेस येणे, आवाज येणे.
(५) हातपाय वाकडे होणे.
(६) त्या काळात स्मृति नष्ट होणे.
(७) दातखीळ बसणे.
(८) जीभ चावली जाणे,
(९) शरीर धाडधाड उडणे.
(१०) शरीर गार पडणे
(११) मलमूत्रप्रवृत्ती नकळत होणे.
(१२) नाडी मंद चालणे.
(१३) वेगकाळात झोप येणे. इतरवेळी झोप न येणे.
(१४) हृदय क्षीण होणे, कापरे भरणे.
पथ्यापथ्य:
(१) रागाचे, निराशेचे, चिंतेचे प्रसंग टाळावेत.
(२) आनंदी, उत्साही, मित्रमंडळींची संगत असावी.
(३) वेळेवर जेवण व झोप, सायंकाळी लवकर व कमी जेवण हे।
आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळावेत.
(४) रात्री एक बदाम भिजत टाकून सकाळी वाटून दुधाबरोबर घ्यावा. बदाम उकळू नये,
(५) ब्राह्मीच्या पानांचा रस एक चमचा सकाळी घ्यावा.
(६) तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, मसालेदार जेवण टाळावे. आहार सात्विक असावा.
(७) गाईचे दूध, मूग, दूधभोपळा, कारले, शेवगा, जून कोहळा,
पडवळ, दोडका, कोथिंबीर, आवळा, गोड ताक, नारळाचे पाणी,
जुने ताबडे तांदूळ, गोड डाळिंब इत्यादी पदार्थ सेवन करावेत.
(८) अतिश्रम, शक्तिपात, शुक्रक्षय कटाक्षाने टाळावा.
(९) पूज्य वस्तूचा अनादर व अपवित्राचा आदर रोग वाढवितो.
धन्यवाद!
Comments
Post a Comment