कोड
कोड हा विकार नाही हे सर्वांनाच माहीत असते. तरी पण
आपल्या देशात कोड असलेल्या माणसाकडे बघण्याची समाजातील
दृष्टि विकृत व चुकीची आहे. त्याकरितां उपचार करण्याची व तो पांढरा डाग दूर करण्याच्या प्रयत्नांची गरज आहे.
यात खूप अघोरी प्रयत्न उदा. हरताळ, मनशीळ यांचे लेप
लावणे इत्यादी उपचार करावयाची बहुधा गरज नाही.
नवीन उद्भवलेले,
थोड्या ठिकाणी असलेले कोड चटकन बरे होते.
कारणे:
१) आनुवंशिकता
२) दही, केळे, टोमॅटो, मीठ, लोणचे, पापड, आंबवलेले पदार्थ
यांचा अतिरेकी वापर.
३) तीव्र तापामध्ये चुकीची व जहाल औषधे घेणे.
४) कृमी, जंत वा मलावरोध असणे.
५) यकृताचे कार्य मंदावल्यामुळे सार्वदेहिक रक्ताभिसरण कमी होऊन त्वचेच्या रंगात फरक पडतो.
६) पॉलिश तांदुळ, खूप स्वच्छ साखर, विरुद्ध आहार यांचा अतिरेकी वापर, समतोल व नैसर्गिक आहाराचा अभाव.
७) कृत्रिम धाग्याचे कपडे वापरणे.
लक्षणे:
१) पांढरे फटक किंवा लालसर गुलाबी असे शरीराच्या कोणत्याही
भागात डाग.
२) फक्त छातीवर व गळ्यावर उठणारे पांढरे, छोटे छोटे ठिपके हे
कोड नसून शिबे नावाचा प्रकार असतो.
पथ्यापथ्य:
१) कोड असलेल्या माणसाकरिता मीठ, दही, सर्व आंबट पदार्थ,
केळे, पाव, इडली, केक असे आंबवून तयार केलेले पदार्थ हे शत्रुसमान आहेत.
२) आळणी व आंबट पदार्थ नसलेला आहार कोडाचा डाग सौम्य
करावयास मदत करतो.
३) सैंधवसुद्धा वापरू नये.
४) परस्परविरोधी गुणाचे मिसळ पदार्थ कटाक्षाने टाळावेत. उदा.
फुटसॅलड, मिसळ भाज्या व उसळी.
५) मांसाहार, परान्न, बाहेरची जेवणे कटाक्षाने टाळावीत.
६) शिक्रण, फुटसॅलड यांचा मोह टाळावा.
धन्यवाद!
Comments
Post a Comment