जंत
जंत
किंवा कृमी विविध प्रकारचे असतात. सुतासारख्या
बारीक कृमीपासून नाकातोंडातून निघणा-या मोठ्या जंतांपर्यंत
अनेक प्रकार जंत कृमींचे आहेत. काही जंत संपूर्ण बाहेर न पडता
तुकड्या तुकड्याने येतात.
लहान मुलांचे बाबतीत चिमटयाने
नाकातोंडातून किंवा परसाकडच्या जागेतून ओढून काढावे
लागतात.
अनेकवेळा कोणत्याही रोगाचे कारण समजत नाही. त्यावेळेस जंताचे इतिहास असतो असे लक्षात येते.
पोटदुखी,अपेंडिक्स अॅटॅक, उलटी, कठीण मलप्रवृत्ति, ताप, जुलाब, कावीळ
एवढेच काय पथरी वाढणे याच्या मागे एक वा अनेक जंत
कारणीभूत असू शकतात.
कारणे:
१) अजीर्ण झाले असताना जेवणे.
२) खूप गोड, आंबट पदार्थ खाणे.
३) व्यायाम न करणे. दिवसा झोपणे.
४) घाणेरडे पाणी पिणे.
५) विरुद्ध अन्न खाणे.
६) पालेभाज्या अधिक प्रमाणात खाणे.
७) मद्य, मांस, मासे, गूळ, दूध, दही, इत्यादि पदार्थ नेहमी
खाणे.
८) अस्वच्छ राहाणे. नखांत माती असणे.
लक्षणे:
१) भूक मंदावणे किंवा खूप भूक लागणे.
२) तोडाला चव नसणे.
३) वरचेवर बारीक ताप येणे.
४) चक्कर येणे, शिरःशूल.
५) पोटात दुखणे, जुलाब होणे.
६) शौचाचे जागी, तसेच नाक खाजवणे.
७) मळमळणे, उलटी होणे.
८) तोंडावर पांढरे चटे उठणे.
९) छातीत दुखणे, पांडुता उत्पन्न होणे.
१०) अंगाला खाज सुटणे,
११) खूप झोप येणे.
१२) दुर्गधीयुक्त जुलाब होणे किंवा मलावरोध होणे.
१३) डोळ्याभोवती काळेपणा, मलीनपणा दिसणे.
१४) जिभेवर विशिष्ट आकाराचे ठिपके व चट्टे येणे.
१५) पालथे झोपणे.
१६) झोपेत दात खाणे.
१७) तोंड उघडे टाकणे.
१८) वजन घटणे.
१९) अनियमित किंवा अजिबात विटाळ अंगावर न जाणे.
२०) अपस्मार (फीटस्) चे झटके येणे.
पथ्यापथ्य
१) पाणी उकळून प्यावे.
२) पोट नेहमी साफ असावे.
३) खरी भुक असली तरच जेवावे. खोट्या भुकेस बळी
पडू नये. ४) स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावेत.
५) शिळे अन्न, फळे, पालेभाज्या कटाक्षाने टाळावेत.
६) आंबलेले पदार्थ उदा. पाव, इडली, डोसा इ. खाऊ
गोळ्या हे लहान मुलांना कटाक्षाने देऊ नयेत.
नयेत. ७) खूप खारट असलेले, गोड, मेवामिठाई, चॉकलेट
८) जेवणात मिरपूड अवश्य असावी. त्यामुळे जंतांचा
प्रकृति विघात' म्हणजेच समूळ नायनाट होण्यास मदत होते.
९) पुदीना, आले, लसूण, जिरे, ओली हळद, शेपा असे
पदार्थ जेवणात असावेत. रात्रौ कमी जेवावे.
धन्यवाद!
Comments
Post a Comment