कानाचे विकार






आयुर्वेदाच्या पांचभौतिक सिद्धांताची खरी परीक्षा कानाचे
विकार बरे करताना आम्हाला येत आहे. आपले नाणे खणखणीत आहे, याची खात्री नाणे बाळगणा-याला आवश्यक असते,असो.

कान हे पोकळीचे, आकाश महाभूतांचे आश्रयस्थान आहे. पृथ्वी, आप या तत्त्वांची फाजील वाढ कानाच्या यंत्रणेत झाली की कानाचे विकार होतात.

त्या फाजील वाढीच्या विरुध्द गुणांची द्रव्ये वापरली असता
कान वाहणे, कानाला सूज येणे, कमी ऐकू येणे हे विकार सोप्या
साध्या उपायांनी बरे होतात.
आजपर्यंत रुग्णांचे कान त्यांच्या
कानाची प्रत्यक्ष तपासणी न करता  सुद्धा ,विकाराचा इतिहास व पांचभौतिक लक्षण ऐकून यशस्वीपणे केलेले उपचार बघून -
शास्त्रसिद्धांतावर नितांत श्रद्धा ही निश्चित फलप्राप्ति देते अशी
धारणा येते.

कारणे
१) कान वाहणे
१) गार वारे, थंडी किंवा पावसात सतत भिजणे.
पाण्यामध्ये खूप डुंबणे, कानास मार लागणे, उन्हातान्हांत हिंडणे, राग करणे.
२) कफवर्धक थंड पदार्थ, खूप तिखट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थांचे अतिरेकी सेवन.
३) तापामध्ये तीव्र औषधे, अँटिबायोटिक्स औषधे अकारण घेणे.
४) टॉन्सिल्स (गिलायुच्या गाठी) प्रमाणाबाहेर वाढणे.

२) कान दुखणे
वरील कारणे लागू आहेतच. याशिवाय
 १) कानात खाज सुटली असता काड्या, पिना कानात घालून कान खाजविणे व दुखापत करणे.
२) कानामध्ये उगाचच गोठणारी खोबरेल तेलासारखी तेले वापरणे. अति बडबड, विचार यामुळे कान रुक्ष होतो.

३) कमी ऐकू येणे
 १) वर दिलेल्या कारणाशिवाय खूप मोठ्याने
बडबड हे एक महत्वाचे कारण आहे.
२) अकाली व मोठ्या संख्येने दात काढणे व त्यावेळेस स्थानिक भूल प्रमाणाबाहेर देणे, ताप, सर्दी पडशाकरिता तीव्र अँटिबायोटिक्स औषधे मोठ्या प्रमाणावर घेणे.

४) कानात खाज सुटणे
खूप थंड व वातवर्धक आहार विहार;
खूप बोलणे, गार वारे लागणे, टॉन्सिल्सची वाढ, कृमी, जंत.


लक्षणे:
१) कर्णस्त्राव (कान वाहणे):
१) कान ओलसर होणे.
२) खूप पू वाहणे.
३) खूप दुर्गंधी सुटणे.
४) कानाच्या अति सूक्ष्म हाडांना इजा पोहोचणे.

२) कर्णशूल (कान दुखणे):
१) कान सतत दुखणे.
२) गार वारे लागले असता दुखणे.
३) कोरडे झाले असता दुखणे.
४) पू झाला असता दुखणे.

३) कर्णबाधिर्य (ऐकू न येणे):
१) अजिबात ऐकू न येणे.
२) ठराविक वेळी ऐकू न येणे.
३) ठराविक ध्वनि ऐकू न येणे.

४) कर्णकंडू (खाज सुटणे) :
१) मळ कोरडा होऊन खाज सुटणे.
२) मळ वाढून खाज सुटणे.

५) कर्णनाद:
१) रातकिड्यांच्या सारखा सतत कीर्र असा आवाज येतो.
२) सायंकाळी हा त्रास असह्य होणे.




पथ्यापथ्य:

१) थंड, जड, आंबट, खारट, गोड या पदार्थांचा अतिरेक असू नये.
विशेषत: मीठ, दही, मासे असे शरीरात स्त्राव वाढविणारे पदार्थ
कटाक्षाने टाळावेत.
२) आईस्क्रिम, कोल्डूिक, तेलकट, तुपकट, फरसाण असे पदार्थ
वर्ज करावेत.
३) वायु व आकाश या तत्त्वाचे वर्धन करणारे व अग्नि सतत प्रज्वलित करणारे अन्न असावे.
४) शेवगा, शेपू, सुरण, कारले, पुदीना, आले, लसूण, ओली हळद,
तुळस, जिरे अशा पदार्थाचा समावेश जेवणात कोणत्यातरी स्वरुपात अवश्य करावा.
५) उकळून गार केलेले पाणी प्यावे. गार वारे, तीव्र ऊन, पाऊस
याच्यापासून कान, घसा, गळा, डोके या सर्वांचे संरक्षण होईल अशी काळजी घ्यावी.
६) कान रुक्ष झाले असताना व त्यामुळे कान दुखत असल्यास शरीरातील रुक्षता घालविण्याकरिता वर सांगितलेल्या पदार्थाच्या उलट पथ्यापथ्य राहील.
७) स्निग्ध पदार्थाचा वापर अधिक करावा. याउलट रुक्ष, कोरडे अन्न टाळावे.
कानाच्या विविध विकारात तारतम्याने पथ्यपाणी सांभाळावे.

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )