हाडांचे विकार



अलीकडे गुडघे बदलणे/खुबा बदलणे याकरिता लाखो रुपये खर्चून शस्त्रकर्म केली जातात. या स्तिथीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या आयुर्वेद शास्त्राची रुग्णांनी परीक्षा घेऊन बघावी.

शरीराचे धारण करणाऱ्या सात धातूतील हाडांचे विकार जरा
वेगळ्या गटात बसतात. रस, मांस, मेद, मज्जा व शुक्र यांचा आधार कफ दोष हा आहे. अस्थिंचा आधार वायु असे शास्त्र सांगते.
 पण वायु वाढला तर अस्थि घटतात, बिघडतात. नुसता कॅल्शियम किंवा चुना असा अस्थिविकाराचा विचार करता येत नाही.
अस्थिंचे पूरण करणारी मज्जा अस्थिविकारात फार मोठा भाग घेते.


कारणे:

१) वातवृद्धी होईल, मजाक्षय होईल, हाडे पोकळ, ठिसूळ होतील
अशी कायिक, वाचिक व मानसिक कारण परंपरा घडणे.
२) अत्यंत परिश्रम, अत्यंत संक्षोभ, कोणत्याही कारणाने हाडे
एकमेकावर घासली जाणे.
३) वातुळ, रुक्ष, खूप थंड, खूप तुरट, तिखट व कडू रसांच्या
पदार्थांचा अतिरेक,
४) कदान्न, शिळे अन्न, हलक्या दर्जाचे अन्न दीर्घकाळ खाणे.
५) अतिमर्दन, धाप लागणे, शरीर अधिक दाबले जाणे.
६) विरुद्ध गुणांचा आहार असणे, अभिष्यंदी म्हणजे स्त्राव वाढेल
असे दही, मासे, मीठ, लोणची, पापड असे पदार्थ खाणे,
आहारात स्निग्ध पदार्थांचा अभाव असणे, उन्हातान्हात हिंडणे.
७) जागरण, उशीरा जेवण, उशीरा झोप, चिंता,
८) शरीर स्थूल होणे, आनुवंशिकता, म्हातारपण.
९) हात, खांदे, मानेचे मणके यांना ताकदीच्या बाहेर काम पडणे,
वजन उचलणे न झेपणे.
१०) बालकांना कृमी, सर्दी, पडसे, कफविकार होणे.

लक्षणे:

१) टाचेचे हाड वाढणे, शरीराचे एकूण वजन वाढणे.
२) हाडे पोकळ होणे, हाडांतील व शरीरातील एकूण मज्जा कमी होणे.
३) हाडांच्या सांध्यामध्ये पोकळी होणे, सूज येणे,
४) हाडे वाढणे, वाकडी होणे.
५) अधिक दांत येणे, नखे जोरात वाढणे, केस अकाली गळणे,पिकणे.
६) हातापायाला मुंग्या येणे, ठराविक बोटांना मुंग्या येणे.
७) हातापायांची हालचाल करणे, अशक्य अशा कळा मारणे.
८) चालायला त्रास होणे,
९) हाड मोडण्याने सांध्यावर सूज येणे.
१०) बालकांचा मांस व अस्थिक्षय होणे, हातापायाच्या काड्या व
पोटाचा नगारा दिसणे.
११) वृद्धांच्या छातीचा पिंजरा आक्रसणे, धाप लागणे.


पथ्यापथ्य:

१) पहिलटकरीण गाईचे दूध, तूप, मांसाहार, मूग, उडीद, चवळी,
वाटाणा, हरभरा, लसूण, आले, फळे, सुकामेवा, डिंक हे पदार्थ; ।
हाडे मोडली असता, मज्जा क्षीण झाली असताना उत्पन्न झालेल्या विकारांत, आहारांत अवश्य असावेत.
२) लोणचे, पापड, मीठ, दही, स्त्राव निर्माण करणारे पदार्थ, रुक्ष,
तिखट, शिळे, कदन्न, हलके अन्न, खूप थंड पदार्थ वज्र्य करावेत.
३) झिजलेल्या वा मोडलेल्या हाडांच्या विकारांत भरपूर विश्रांती
घ्यावी. अकारण दगदग, अतिश्रम व ओझी उचलणे टाळावे. लिखाण किंवा टाईपिंगचे अति काम करू नये.
४) व्यायाम, मैथुन, उन्हांत काम टाळावे.


धन्यवाद!





Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )