ब्लडप्रेशर blood pressure
संतर्पणोत्थ व्याधींचे म्हणून ब्लडप्रेशर व मधुमेह या विकारांकरिता
आम्ही सर्वांची नीट
परीक्षा, तपासणी, रक्तदाब नोंद वगैरे करून त्यांना पूर्ण आयुर्वेदीय पद्धतीची औषधे आम्ही दिली. अॅलोपॅथीची औषधे बंद केली.
सांगायची गोष्ट म्हणजे बहुतांशी रुग्णांचा रक्तदाब पहिल्या आठवड्यात व एकूण पुढील महिन्यात बराच कमी झाला. सर्वांचीच औषधे सारखी होती
असे नव्हे.
त्यांच्या अन्य लक्षणांवरून वा इतिहासावरून कमी अधिक
वेगवेगळी औषधे दिली होती.
आयुर्वेदात ब्लडप्रेशर व मधुमेहावर औषधे नाहीत असे समजणाच्या आपल्या डॉक्टर, वैद्य मित्रांना; या
रुग्णांच्या अनुभवामुळे आम्हाला आत्मविश्वासपूर्वक, आधारपूर्वक
आयुर्वेदाची महती पटवून देता आली.
रक्तदाब हा विकार आहे का लक्षण आहे का अवस्था आहे
याची सामान्य रुग्णाला बिलकुल फिकीर नसते. त्याला रक्तदाबवृद्धी
किंवा क्षय; यामुळे ब्लडप्रेशर वाढणे किंवा एकदम कमी होणे या घट्पटादि चर्चा,सर्व फावल्या वेळातील तात्विक चर्चा होतात.
कदाचित त्याचा उपयोग ज्ञानी माणसांना स्वत:च्या व इतरांच्या ज्ञानाला उजाळा देण्यास होत असेल. असो.
रक्तदाबवृद्धी व क्षय या दोन्ही भिन्न अवस्था आहेत. त्यांची
कारणपरंपरा, लक्षणसमुच्चय, रोगप्रवास, उपशय, अनुपशय व उपचार भिन्न आहेत.
पथ्यपाणी भिन्न आहे.
रोग समजण्यात नेमकेपणा असेल तर औषधी योजकता अवघड नाही. ब्लडप्रेशरबरोबर अन्य लक्षणसमुच्चय, अवस्था समजून घेण्याकरिता मनुष्यस्वभाव, त्याचा आहारविहार, राहणी, परिसर हे सर्व समजून घ्यावयास हवे.
कारणे:
रक्तदाबवृद्धी:
१) आनुवंशिकता, चाळीसचे वर वय असणे, स्थौल्याकडे झुकणे.
२) फाजील पोषणामुळे रसरक्तवाहिन्यामध्ये क्षार किंवा चरबी
साठून रक्ताभिसरणात अडथळा होणे,
३) स्थौल्य किंवा चरबी वाढेल असा आहार असणे.
उदा. साखर,मांसाहार, तेलकट, तुपकट पदार्थ, मीठ, भात, कडधान्ये, आइस्क्रीम यांचे अतिरेकी सेवन.
४) जेवणात कडू, तिखट, तुरट रसांच्या, चवीच्या पदार्थांचा वापर
नसणे.
५) चिंता, कमी किंवा खंडित झोप, व्यायामाचा अभाव, बैठेकाम, धास्ती, मानसिक ताण,
६) मूत्रप्रवृत्ती व एकूण मूत्राचे प्रमाण कमी होणे,
७) हृदयाच्या स्नायूंचे कार्य शिथिल किंवा मंद होणे.
कारणे:
रक्तदाबक्षय:
१) रक्ताचे शरीरातील एकूण प्रमाण कमी होणे, ते कमी होईल
अशा पांडु विकाराची कारणे घडणे.
२) पित्त वाढेल अशा तीक्ष्ण, उष्ण, तिखट, आंबट पदार्थांचा
आहारात जास्त वापर असणे.
३) जेवणात स्निग्ध किंवा शरीराचे पोषण आवश्यक असणाऱ्या समतोल पदार्थांचा अभाव असणे.
४) चिंता, काळजी, धास्ती, कमी झोप किंवा झोपेचा अभाव,
मानेच्या मणक्यांचा विकार उत्पन्न होईल अशी जाड उशी घेणे.
५) इतर विकारांकरिता स्ट्राँग औषधे घेणे,
लक्षणे:
रक्तदाबवृद्धी:
१) पन्नास वयापर्यंतचा वरचा रक्तदाब एकशेतीसचेवर; खालचा
रक्तदाब ऐंशीचेवर गेल्यास रक्तदाबवृद्धीच्या विकारास सुरुवात
आहे असे समजावे. पन्नासचे वरील वयाचे लोकांकरिता वरच्या
रक्तदाबाची मर्यादा शंभर आकड्यामध्ये वयाचा आकडा मिसळून
ठरविता येते. उदा. बासष्ट वयाचे माणसाचा वरचा रक्तदाब
एकशे बासष्टचेवर जाऊ नये, खालचा रक्तदाब हा नव्वदचेवर
जाणे म्हणजे रोगाने घर केले आहे असे समजावे.
२) हाताला मुंग्या येणे, डोके गरगरणे, तोल जाणे, मान दुखणे,
जीव घाबरा होणे,
३) थकवा येणे, दृष्टी कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे,
मुतखडा असणे, वजन वाढणे, अंगाला खाज सुटणे, पायाला व
लघवीला घाण वास मारणे, अस्वस्थ वाटणे, झोप न येणे.
४) अर्धांगवात किंवा हृद्रोगाचा, अर्दिताचा अॅटॅक संभवतो.
लक्षणे:
रक्तदाबक्षय :
१) चक्कर येणे, तोल जाणे, हातापायात त्राण नसणे, काही करावेसे न वाटणे, उमेद खचणे,
२) रक्ताचा एकूण पुरवठा कमी होणे, पांडुता येणे, डोळे
ओढल्यासारखे होणे व वजन कमी होणे,
३) झोप न येणे, झोप खंडित राहणे, हाताला मुंग्या येणे, मानेच्या
मणक्यातील अंतर कमी-जास्त होणे,
४) कोणत्याही परिस्थितीत अर्धागाचा झटका येत नाही.
पथ्यापथ्य:
रक्तदाबवृद्धी:
१) मीठ, साखर, तेलकट, तूपकट पदार्थ, भात, बटाटा यांसारखे
पिष्टमय पदार्थ, आइस्क्रीम, कोल्ड्रिक यासारखे थंड पदार्थ
वर्ज करावेत.
२) विलासी राहणी, दुपारी झोप, बैठे काम, हालचालीचा अभाव,
चिंता, शोक, धास्ती या सर्व गोष्टी टाळाव्यात.
३) वेळेवर व पुरेशी झोप घ्यावी.
४) लघवीला पुरेशी व व्यवस्थित होते का, ते पाहावे.
५) स्थूल माणसाने वजनावर लक्ष ठेवावे. त्याकरिता पुरेसा व्यायाम,हालचाल, शरीरास आवश्यक आहे.
६) रात्रौ भोजनोत्तर पंधरा मिनिटे फिरावे.
पथ्यापथ्य:
रक्तदाबक्षय:
१) वेळेवर व सकस जेवण, किमान श्रम, वेळेवर व पुरेशी झोप
हवी. चिंता, शोक, भय, धास्ती, दु:ख लांब ठेवावे.
२) मन प्रसन्न राहील अशा वातावरणात राहावे.
३) शक्तीवर्धक आहारविहारावर जोर असावा.
४) फार तिखट, आंबट, खारट, कदान्न वज्र्य करावे.
५) साखर व मीठ आहारात पुरेसे असावे,
६) डोक्याला त्रास होणार नाही इतपतच वाचन करावे.
धन्यवाद!
Comments
Post a Comment