उपवास Fasting
भारतीय संस्कृती आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्त्व आहे.
परंतु हे उपवास केवळ धर्माच्या नावावर केले जातात.
याचे आरोग्याचे दृष्टिने अधिक महत्व आहे. कारण उपवासामुळे अग्निप्रदीप्त होऊन आरोग्य टिकुन राहते.
आयुर्वेदामध्ये चिकित्सेकरिता षट्कर्मे सांगितलेली आहेत.'
१) लंघन २) रुक्षण ३) स्नेहन ४) बृहण ५) स्वेदन ६) स्तंभन,
ह्या घटकर्मामध्ये प्रथम कर्म लंघन आहे.
लंघनः यत्किंचितल्लाघवकरं देहे तल्लघनं स्मृतम् ।
। च.सू. २२/९
शरीरामध्ये लाघवता उत्पन्न करणाच्या क्रियेला वा द्रव्याला लंघन असे म्हणतात,
पाचनान्युपवासश्च व्यायामश्चेति लंघनम् ॥
प्रकार । चतुष्प्रकारा संशुद्धिः पिपासा मारुतातपौ।
च.सू.२२/१९ ।
वमन, विरेचन, नस्य आणि निरुह वस्ति (हे शोधनाचे चार प्रकार),
पिपासा, मारुतसेवन, आतपसेवन, पाचन औषधींचे सेवन, उपवास आणि व्यायाम
हे दहा प्रकार लंघनाचे वर्णिलेले आहेत. उपवास ह्या लंघनाच्या दहा प्रकारापैकी एक प्रकार आहे.
उपवास
हा पुण्यप्रद, आमाचे पाचन करणारा, स्फुर्ती प्रदान करणारा आणि इंद्रियप्रसादक आहे.
त्याकरिता आरोग्य टिकविण्याचे दृष्टीने उपवासाला महत्व आहे.
प्रकार यांचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
१) निराहार २) फलाहार
निराहाराचे पुनःदोन प्रकार पडतात.
१) सजल आणि २) निर्जल
ह्यात निराहार उपवास श्रेष्ठ आहे, परंतु निराहार उपवास करणे शक्य नसेल तर फलाहार घेऊन उपवास करावा. प्रत्येक व्यक्तिने आपली प्रकृती, वय ,बल, काल आणि सात्म्य यांचा विचार करुन उपवास करावा,
आमाजीर्ण अवस्थेत उपवास केल्याने उपशय मिळतो.
त्वग विकार, प्रमेह, अतिस्निग्ध, बृहण केलेले आणि वात व्याधि ग्रस्त व्यक्तिंना शिशीर ऋतुमध्ये लंघन दयावे असे आचार्य चरकांनी सांगितलेले आहे.
त्वग्दोषिणां प्रमीढानां स्निग्धाभिष्यन्दि बृहिणाम् ।
शिशिरे लंघनं शस्तमपि वातविकारिणाम् ॥
च.सू.२२/२४
आचार्य वाग्भटानी प्रमेह, आमदोष, अतिस्निग्ध, ज्वर, उरुस्तंभ कुष्ट,
विसर्प, विद्रधि, प्लीहा, शिरोरोग, कंठरोग, नेत्ररोग, अतिस्थूल यांना लंघन देण्यास सांगितलेले आहे.
शिशीर ऋतुमध्ये सर्वाना लंघन दयावे असे सुचविलेले आहे.
अल्पबल, कफपित्तजन्य व्याधि, वमन, अतिसार, हृद्रोग, विसूचिका, अलसक, विबंध, गौरव, उद्गार, हृल्लास हे व्याधि उपवासार्ह मानलेले आहे,
ह्यामध्ये निर्जल उपवास (पिपासा निग्रहपूर्वक) करावा.
सम्यक लंघनाची लक्षणे:
इंद्रिय निर्मलता, मलप्रवृत्ति, लाघव, भोजनामध्ये रुचि ।
निर्माण होणे, क्षुधा आणि तृष्णा यांची संवेदना होणे (भूक व तहान लागणे) हृदय
उद्गार, कंठशुद्धि उत्साह तसेच तंद्रानाश ही लक्षणे दिसू लागताच त्याला योग्य असा आहार दयावा. नाहीतर अतिलंघनाची लक्षणे उत्पन्न होतील.
अतिलंघनाची लक्षणे: पर्वभेद, अंगमर्द, कास, मुखशोष, क्षुधानाश, अरुचि, तृष्णा
नाश ही अति लंघनाची लक्षणे आहेत.
श्रोत्र-नेत्र दौर्बल्य, मनामध्ये भ्रम निर्माण होणे, उर्ध्ववात, शरीर, अग्नि, बल यांचा नाश
उत्तम आरोग्याकरिता आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक ठरते.
जे व्यक्ति उपवास करु शकत नाही त्यांनी लघु भोजन अल्प मात्रेत घ्यावे.
Comments
Post a Comment