कावीळ jaundice




कावीळ म्हणजे कामला, काम म्हणजे इच्छा. इच्छेचा पूर्णपणे
लय ती कावीळ,काविळीमध्ये नुसतीच भूक मंद असते असे नसून, काहीच करावेसे न वाटणे अशी दयनीय अवस्था असते ,दीर्घकाळ रोग्याला त्रास भोगावा लागतो.

कावीळ हा विकार गणिताप्रमाणे नेमके कारण, नेमके स्थान,
नेमका उपचार व पथ्यापथ्य असा निश्चितपणे नेमक्या कालावधीत बरा करता येतो असा आमचा विश्वास आहे.


कारणे
(१) सार्वदेहिक पित्त वाढल्यामुळे (बहुपित्तकामला):

१) खूप तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ नियमाने
खाण्यात येणे.
२) जागरण, चिंता, उन्हात हिंडणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक,
३) कळत नकळत चुकीची व मोठ्या मात्रेने तीव्र औषधे व
व्हिटॅमिन्स घेणे.
४) दही, गूळ, लोणचे, मिरची, पापड, मांसाहार, शिळे अन्न
यांचा सातत्याने वापर.


(२) पित्ताचा मार्ग अडल्यामुळे (रुद्धपथकामला):

१) खराब, दूषित पाणी पिणे.
२) दुधामध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे विषारी होणे.
३) कृमी किंवा जंत होणे.
४) भूक न लागणे, मंद होणे.
५) परसाकडे साफ न होणे,
६) सार्वदेहिक पित्त वाढण्याकरिता, कारण असलेली, वर
सांगितलेली सर्व कारणे.


लक्षणे:

(१) बहुपित्तकामला:

१) नखे, डोळे, त्वचा, लघवी परसाकडे सर्वाला पिवळेपण असणे
२) तीव्र विकारात लघवीचा रंग लाल होणे.
३) त्वचा पांढरीफटक पडणे.
४) भूक मंद असणे,
५) शौचास साफ होते किंवा होत नाही.
६) यकृत व प्लीहा यांना सूज असणे वा नसणे.
७) खूप थकवा, अंगाला विलक्षण कंड.
८) काहीच करावयाची इच्छा नसणे,


(२) रुद्धपथकामला:

१) डोळे, त्वचा, लघवी यांचा रंग पिवळा असणे.
३) भूक मंद होणे,
२) मळ पांढरा किंवा काळा असतो, पिवळा निश्चित नसणे.
४) शौचास साफ न होणे,
५) थकवा येणे.
६) अरुचि, अंगाला कंड सुटणे.
७) त्वचा पांढरकी होणे.
८) लघवीला लाल रंग अधिक येणे.
९) यकृत व प्लीहेला सूज अधिक येणे.
१०) पोटाचा घेर वाढणे.


पथ्यापथ्य:

१) पाणी उकळून प्यावे.
२) दूध पिऊ नये. कारण दुधातील जंतू उकळूनही मरत नाहीत.
३) तेल, तूप पूर्ण वज्र्य करावे.
४) तांदूळ भाजून भात; तांदुळाची भाकरी, उकडलेल्या भाज्या (दोडका,दुधीभोपळा, पडवळ, कोहळा, कालें, चाकवत इत्यादी) व बिनतिखटामिठाची किंवा कमीतकमी प्रमाणात असलेली मूगाच्या डाळीची आमटी घ्यावी.
५) ऊसाचे तुकडे घरी करून चावून खावे, ऊसाचा रस पिऊ नये.
६) भरपूर मनुका खाव्यात.
७) साळीच्या, राजगिन्याच्या किंवा ज्वारीच्या लाह्यांचा आहार जास्त असावा.
८) जास्तीत जास्त झोपून राहावे. जास्त हालचाल केली तर यकृताची सूज कमी होत नाही.



धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )