विटाळाचे विकार menstrual problems
स्त्रियांच्या नेहमीच्या तक्रारी विटाळ व लठ्ठपणा या दोन
विकारांशी संबंधित आहेत. वयाच्या चाळीशीच्या आसपासच्या
बहुसंख्य स्त्रियांना विटाळ कमी जाणे व चरबी वाढत जाणे या दोन्ही तक्रारी हातात हात घालून त्रास देत असलेल्या दिसतात.
आयुर्वेदीय ईलाज घ्यायला लागल्यापासून नुसतीच
पाळी साफ येऊ लागली असे नसून, वजन घटले, काम करावयास
हरुप आला ,अशी वाक्ये कानी येतात.
विटाळ हा मराठी भाषेतील शब्द period, menstrual cycle, menses यासाठी वापरला जातो . तसेच संस्कृत
शब्द म्हणजे आर्तव.
आर्तवाचे प्रमाण हे व्यवस्थित असले
म्हणजे स्त्रियांचे सर्व त-हेचे स्वास्थ्य असते.
शहरी जीवनांतील कृत्रिम राहणी, अवेळी व एकांगी आहार, धावपळ, पुरुषी पद्धतीच्या जीवनाचा
नाईलाजाने अंगीकार अशा विविध कारणांनी स्त्रियांना विटाळ कमी येणे; उशीरा येणे; अजिबात न येणे; नुसतेच दर्शन होणे; विटाळाचे काळी कष्ट होणे; अंगावर खूपच जाणे; विटाळास घाण वास मारणे;गांठी जाणे अशा विविध स्वरूपाच्या पीडा होत असतात.
वयात आल्यानंतर वयाच्या बारा तेरा वर्षांपासून पन्नास
वयापर्यंत; गर्भारपणाचा काळ सोडल्यास स्त्रीला, दर अठ्ठावीस दिवसांनी
चार दिवस व्यवस्थित विटाळ यावा. घाण वास, डाग पडणे, कष्ट
होणे, अति विटाळ जाणे या गोष्टी अपेक्षित नसतात.
या तक्रारी वेळच्यावेळी नीट हाताळल्या तर स्त्री आपले पत्नी, गृहिणी, माता, सचिव अशा विविध जबाबदा-या सहजपणे पेलू शकते.
कारणे:
(१) विटाळ अजिबात न येणे:
१) गर्भाशय व आर्तववाहिन्या यांच्या रचनेतील दोष
२) आर्तवच तयार न होणे
३) पांडुता ४) कृमी, जंत, मलाविरोध
५) पाळी पुढे ढकलण्याकरिता किंवा मूल होऊ नये म्हणून
नेहमीच औषधे घेत राहणे.
६) कृत्रिम जीवन, राहणी, आहार,अनिद्रा, अधिक शारीरिक श्रम
(२) विटाळ अकाली बंद होणे:
वरीलपैकी ३ ते ६ पर्यंतची कारणे
(३) विटाळ कमी जाणे:
१) क्र. १ मधील ३ ते ६ पर्यंतची कारणे
२) चाळीशीचे आसपास वय असणे.
३) स्थौल्य
(४) विटाळ कष्टाने येणे, पोट दुखणे :
वायु यांचा प्रकोप होईल असे खाणे, पिणे, वागणे.
१) क्र.१ मधील ३ ते ६ पर्यंतची कारणे
२) स्थौल्य ३) पित्त,
(५) विटाळास घाण वास, गाठी :
१) कृमी, जंत, मलावरोध, आव या पोटाच्या तक्रारी सतत
राहणे.
२) अंगावर पांढरे जाणे ही खोड दीर्घकाळची असणे.
३) पांडुता
(६) विटाळ उशीरा येणे:
१) क्र. १ मधील ३ ते ६ पर्यंतची कारणे
(७) विटाळ लवकर येणे :
१) तिखट, आंबट, खारट, उष्ण, तीक्ष्ण पदार्थांचा अतिरेकी
वापर.
२) वजन कमी करण्याकरिता स्ट्राँग औषधे घेणे,
(८) विटाळ खूप दिवस व खूप प्रमाणात जाणे :
१) क्र. ७ मधील कारणे
२) चाळीशीच्या आसपास वय
असल्यावर कालमानाने त्रास होणे.
३) गर्भाशयास सूज येणे.
(९) ओव्हरीला सूज किंवा सिस्ट असणे.
(१०) सोनोग्राफीत पी सी ओ डी असे निदान असणे.
लक्षणे:
१) विटाळ अजिबात न येणे, चेहरा बोजड, रुक्ष किंवा बालिश
दिसणे, शरीर स्थूल, पुरुषी दिसणे.
२) शरीर स्थूल होणे, रक्त कमी होणे
३) चार दिवसांपेक्षा कमी दिवस विटाळ जाणे, नुसते दर्शन होणे
किंवा कमी विटाळ जाणे. सर्व शरीर जड वाटणे.
४) पाळीच्या अगोदर पोट, पाय, कंबर दुखणे. विटाळ येताना
कष्ट होणे.
५) विटाळात गांठी पडणे, पांढरा पिवळा किंवा काळसर स्त्राव
जाणे, घाण वास मारणे, अस्वस्थपणा, दौर्बल्य वाटणे.
६) अठ्ठावीस दिवसांऐवजी दोन दोन, तीन तीन महिन्यांनी किंवा
त्याहीपेक्षा उशीरा विटाळ येणे, स्थूलपणा वाढणे, शरीराची
हालचाल, हुरुप मंदावणे,
७) थकवा, पांडुता, गळून जाणे ही लक्षणे होणे.
८) पांडुता, थकवा वाढणे. पाळीचे दिवस व इतर दिवस यांत
फार फरक नसणे. पंधरा वीस दिवस विटाळ चालू राहणे.
पथ्यापथ्य:
(१) विटाळ कमी जाणे, अजिबात न येणे, स्थौल्य
या तक्रारीत चरबी वाढेल असे पदार्थ खाऊ नयेत. भात, साखर,
डालडा, बटाटा, मीठ, कडधान्ये, मांसाहार वर्क्स करावा. शारीरिक श्रम हवेत. हलका व कमी आहार असावा.
(२) विटाळ कमी जाणे याकरिता रक्त कमी हे कारण
पांडुतेमुळे विटाळ कमी जात असल्यास रक्तवर्धक, पौष्टिक ।
आहार विहार हवा, वेळच्यावेळी जेवावे. फळे, दूध, कडधान्ये, मांस, अंडी असा पचनाग्निला मानवेल असा आहार घ्यावा. पचनशक्ति व भूक वाढावी म्हणून पुदिना, आले, लसूण असे पदार्थ वापरावेत.
(३) विटाळ खूप जात असल्यास तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ टाळावेत. मिरची,मसाला, दही, लोणचे, मांस, अंडी खाऊ नयेत. भरपूर तूप व दूध घ्यावे.
(४) विटाळाच्या गांठी, त्या कालातील शूल
या तक्रारींकरिता पोटात वायु धरेल, अजीर्ण होईल असा आहार
विहार कटाक्षाने टाळावा. तेलकट, जड, खूप थंड पदार्थ खाऊ नयेत.
लसूण, पुदिना, आले, जिरे हे पदार्थ जेवणात असावेत.
धन्यवाद!
Comments
Post a Comment