मनोविकार mental disorders

 

मनाचे विकार  या वर लिहिणे अवघड आहे. मन
अनाकलनीय आहे. मनाचे व्यापार वायुतत्वाने नियंत्रित आहेत. एकवेळ दारे खिडक्या लावून घरात वायूपासून संरक्षित राहता
येईल. पण मनाची कवाडे बंद करून स्थिर चित्त राहणे भल्या भल्या
योगीराजांनाही अवघड जाते.



कारणे:

१) अडखळत बोलणे:
शारीरिक व्यंग असणे, जीभ आखूड असणे, चुकीच्या जागी टाका
असणे, जीभ जड असणे, स्वरयंत्रात अडथळा असणे, कानात दोष असणे,
आत्मविश्वासाचा अभाव, घरातील मोठ्यांचा अकारण फार मोठा धाक,
वरिष्ठांचे दडपण, हस्तमैथुनामुळे ओजक्षय, कृमी, जंत किंवा पोटाच्या तक्रारीने
सदैव अस्वस्थता, नपुंसकत्व,


२) आत्मविश्वास नसणे:
रस व रक्त, धातूवर काही कारणाने आघात होणे, दुबळेपणा येणे,
कामाचा एकदम भार वाढणे, सभोवतालचे वातावरण सदैव निरुत्साही असणे,
नियमित व्यायामाची पहिल्यापासून अजिबात सवय नसणे. छातीचा घेर लहान
असणे. घात, अपघात याने आकस्मिक खचून जाणे, संतति नसणे,
नपुंसकत्व,


३) न्यूनगंड:
आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीमुळे वेळेवर वर येण्याची संधी
न मिळणे. बरोबरच्या सवंगड्यांच्या प्रगतिबरोबर आपली प्रगती होत
नसल्यामुळे अधिक खचणे, हस्तमैथुन, निद्रानाश, पांडुता, नपुंसकत्व.


४) बुद्धिमांद्य:
व्यायामाचा अभाव किंवा खेळ याची अजिबात सवय नसणे.
अनुवंशिकता, लहानपणी तीव्र आजाराने ग्रस्त असणे, कृमी, जंत,
मलावरोध किंवा माती खाण्याचे दुष्परिणाम, असमतोल आहार. कदन्न खाणे.
आसपासची व कौटुंबिक परिस्थिती बुद्धिच्या विकासास पोषक नसणे.

लक्षणे :

१) अडखळत बोलणे:
एकूण बोलण्यात खूप अडखळणे असणे. सुरवातीला बोलावयास स्टार्ट
घ्यावयास वेळ लागणे. एकदा बोलावयास लागल्यावर पुढे अडचण न येणे.
नेहमी व्यवस्थित बोलता येणे, पण वरिष्ठांच्या घरातल्या एखाद्या मोठ्या
व्यक्तिच्या दडपणाने अडखळत बोलणे.

२) आत्मविश्वास नसणे:
नेहमीचे मर्यादित काम जेमतेम करणे. अधिक काम पडल्यास गडबडून
जाणे, संकटकाळात, घात अपघात प्रसंगी किंवा थोडेसे नुकसान झाल्याबरोबर
अवसान गळणे, कोणत्याच कामात आपणहून पुढाकार न घेणे.

३) न्यूनगंड:
शारीरिकदृष्ट्या प्रकृति ठणठणीत असूनही शारीरिक कष्टाचे काम होणार
नाही अशी कल्पना करून घेणे, लौकिक, शिक्षण, व्यवस्थित झालेले असूनही
नसलेले न्यून किंवा कमीपणा शोधून त्यामुळे सदैव माघार घेणे, आताचे
त्याचा उपयोग करण्याची संधी मिळाली असता ती नाकारणे, स्वत:मध्ये
धावपळीचे युगात, माणसांचे गर्दीपासून लांब राहणे. थोडक्यात प्रकाश आला
असता डोळे मिटणे.

४) बुद्धिमांद्य:
वयाच्या, शिक्षणाच्या व अनुभवाच्या मानाने; आलेल्या प्रसंगात बुद्धिच्या
वापराचा अभाव दिसणे. किमान स्मरणशक्तीच्या अभावाचा नेहमीच अनुभव
दगा देणे.
देगा देणे.
येणे, खूप वाचून शिकूनही अनेकवेळा लक्षात न रहाणे, स्मरणशक्ती ऐनवेळी



पथ्यापथ्य:

१) अडखळत बोलणे:
थंड, तेलकट, डालडा असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जेवणात
तुळस, पुदीना, आले, लसूण यांचा वापर असावा. शक्य असल्यास रोजी एक बदाम किंवा जर्दाळू खावा.
२) आत्मविश्वास नसणे:
तिखट, आंबट, खारट हे पदार्थ टाळावेत. गरम पेय घ्यावे. जेवणात उडीद, मूग, गहू, तूप, साखर यांचे प्रमाण अधिक असावे. कदन्न खाऊ नये.
३) न्यूनगंड:
स्वत:ला प्रिय वाटेल, आवडेल अशा वातावरणाची निवड करून
जेवणखाण करावे.
४) बुद्धिमांद्य:
तेलकट, तुपकट, डालड़ा, खूप थंड असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
रात्रौ लवकर जेवावे. एकूण जेवणावर ताबा असावा.
सर्वांच्या हिताचे आहे.
व्यायाम, दीर्घ श्वसन, खेळ, पिंपळ प्रदक्षिणा, आनंदी राहणे

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )