अंगावर पांढरे जाणे White discharge
महाविद्यालयातील दवाखाण्यात मध्यमवयीन किंचित् कृश अशी स्त्री हळूच आमच्या सिनियर वैद्य डॉक्टरांशी बोलू
लागली की अंगावर पांढरे जात आहे अशी खात्री येत होती.
तीस ते चाळीस वयाच्या दरम्यान बऱ्याच स्त्रियांना ही तक्रार असते.
त्यामुळे कंबर दुखणे, दुबळेपणा व एकप्रकारचा अनुत्साह, नेहमीच आढळतो.
थोडाफार वेळेवरचा उपचार, किमान औषधे, दक्षता व स्वच्छता या गोष्टी पाळल्या तर हा रोग नुसताच बरा होतो असे नाही तर कितीही कामाला स्त्री खंबीरपणे तोंड देऊ शकते.
तसेच योग्य उपचारांच्या अभावी
चिरकाल, दीर्घकाळ रेंगाळणारे दुखणे होऊ शकते.
कारणे
१) शरीरात रुक्षता किंवा वायु वाढेल असे खाणे, वागणे
किंवा कुपथ्य करणे.
२) ताकदीच्या बाहेर श्रम व श्रमाच्या मानाने कमी खाणे,
पिणे.
३) निकृष्ट व शिळे अन्न, अपुरी विश्रांती, चिंता जागरण इ.
४) विटाळ (menses)मागेपुढे करण्याकरिता अकारण औषधे घेणे.
५) विटाळाचे काळात स्वच्छता व आवश्यक ती काळजी
न घेणे.
६) पांडुता, दुबळेपणा, क्षय, कार्य असा विकारांचा इतिहास
असणे.
७) तिखट, आंबट, खारट, रुक्ष, कोरडे, खूप थंड अशा
पदार्थांचा जेवणामध्ये समावेश.
लक्षणे
१) कोणतीही जास्त हालचाल व श्रम केले असता किंवा
नैसर्गिक क्रियाकर्म करताना अंगावरुन पांढरट, पिवळट असा विटाळ जाणे,
२) कंबर दुखणे, पाय दुखणे.
३) दुबळेपणा, थोडासाही अधिक कामाचा ताण सहन होणे.
४) पांडुता, निरुत्साह, डोकेदुखी इ.
५) मूत्रप्रवृत्ति वाढणे.
६) हातापायाला मुंग्या येणे.
पथ्यापथ्य:
१) खूप थंड, रुक्ष, कोरडा असा आहार नसावा.
२) शिळे व कदन्न कटाक्षाने टाळावे.
३) वेळेवर विश्रांती व पुरेशी झोप आवश्यक आहे.
४) कमरेच्या भागावर फाजील ताण पडेल अशी श्रमाची
कामे टाळावी.
५) शक्तिपात होईल असे वर्तन नसावे.
६) मासिक पाळीचे काळात जास्तीत जास्त स्वच्छता पाळावी.
७) आहारमध्ये रक्त व सुधावर्धक पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
८) चिंता, राग व मनाचा क्षोभ होईल असे वर्तन असू नये.
९) जेवणामध्ये जिरे, धने, कोथिंबीर, खजूर, मनुका, दूध,
तूप असा सात्विक आहार असावा.
Comments
Post a Comment