मूतखडा kidney stone

काळ्या चिकण मातीच्या शेतात चिक्कार पाऊस पडल्यावर चिखल झाला व त्यावर कडक प्रखर असे ऊन पडल्यावर तो चिखल वाळला की एक प्रकारचा कडक, टणक दगडासारखा चिखल तयार होतो. त्याप्रमाणेच शरीरास खूप पीडा देणाया मुतखड्याची निर्मिती वृक्कांत (किडनीत) होत असते. कारणे: १) खूप थंड, खूप उष्ण, गोड, तिखट, कफवर्धक, पचावयास जड, तेलकट, तुपकट, चहा, टोमॅटो, तीळ, काजु, कोबी, खुप बियांचे वांगे, काकडी पालेभाज्या अशा पदार्थांचा जेवणात अतिरेक असणे. २) झोप, विश्रांति, कामाच्या वेळा यांच्याकरिता असलेले आरोग्याचे सामान्य नियम न पाळणे. शौचाचा व लघवीचा वेग अडविणे, विशेषतः लघवीस वेळेवर न जाणे. ४) चहा, विडी, तंबाखू, कोल्ड्रिंक, मद्यपान यांचे अधिक सेवन करणे ५) वेडीवाकडी आसने, अवघडून बसणे, कसरतीचे वा मेहनतीचे ताकदीपेक्षा अधिक श्रम. ६) डोकेदुखी वा अन्य वेदना शमविण्याकरिता वेदनाशामक ए. पी. सी. असलेल्या गोळ्या नियमाने बराच काळ घेणे. लक्षणे: १) वृक्क (किडनी), मूत्रवाहिनी, मूत्राशय, पाठ, कंबर, ओटीपोट या भागांत कळा मारणे, काही वेळेस त्या कळा असह्य होणे. २) लघवी अडखळत, थोडी थोडी व काही वेळेस दोनधारा असल...