Posts

Showing posts from September, 2018

कोड

Image
कोड हा विकार नाही हे सर्वांनाच माहीत असते. तरी पण आपल्या देशात कोड असलेल्या माणसाकडे बघण्याची समाजातील दृष्टि विकृत व चुकीची आहे. त्याकरितां उपचार करण्याची व तो पांढरा डाग दूर करण्याच्या प्रयत्नांची गरज आहे. यात खूप अघोरी प्रयत्न उदा. हरताळ, मनशीळ यांचे लेप लावणे इत्यादी उपचार करावयाची बहुधा गरज नाही. नवीन उद्भवलेले, थोड्या ठिकाणी असलेले कोड चटकन बरे होते. कारणे: १) आनुवंशिकता २) दही, केळे, टोमॅटो, मीठ, लोणचे, पापड, आंबवलेले पदार्थ यांचा अतिरेकी वापर. ३) तीव्र तापामध्ये चुकीची व जहाल औषधे घेणे. ४) कृमी, जंत वा मलावरोध असणे. ५) यकृताचे कार्य मंदावल्यामुळे सार्वदेहिक रक्ताभिसरण कमी होऊन त्वचेच्या रंगात फरक पडतो. ६) पॉलिश तांदुळ, खूप स्वच्छ साखर, विरुद्ध आहार यांचा अतिरेकी वापर, समतोल व नैसर्गिक आहाराचा अभाव. ७) कृत्रिम धाग्याचे कपडे वापरणे. लक्षणे: १) पांढरे फटक किंवा लालसर गुलाबी असे शरीराच्या कोणत्याही भागात डाग. २) फक्त छातीवर व गळ्यावर उठणारे पांढरे, छोटे छोटे ठिपके हे कोड नसून शिबे नावाचा प्रकार असतो. पथ्यापथ्य: १) कोड असलेल्या माणसाकरिता मीठ, दही, ...

सायटिका किंवा गृध्रसी Sciatica

Image
सायटिका वातविकारात ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. रस, रक्त, मांस इत्यादी धातूचा क्षय झाल्यामुळे वात वाढतो. तसेच वाताच्या सर्व त-हेच्या कार्यात, स्त्रोतसातील अडथळ्यामुळे, वहनक्रिया बिघडून नवनवीन वातविकार उत्पन्न होतात. सायटिका किंवा गृध्रसी हा विकार दस-या प्रकारात मोडतो. शास्त्रकारांनी, पाष्र्णि प्रत्यंगुलीनां या कंडरा मारुतार्दिता । सक्थ्युत्क्षेपं निगृहाति गृध्रसीं तां प्रचक्षते ।।                                       अष्टांग हृदय नि. १५/६४ जरी एवढेच वर्णन केले असले तरी जेव्हा या विकाराच्या कळा, तीव्र वेदना सुरू होतात तेव्हा काही बोलता सोय नाही इतका त्रास रोगी भोगतो. तीव्र वेदनांच्या गृध्रसीस शास्त्रात खल्ली म्हणतात. आगंतु कारणाप्रमाणेच, आमनिर्मिती हे एक प्रमुख कारण सायटिका विकारात आहे असा अनुभव आहे. कारणे: १) अग्निमांद्य असताना पचावयास जड, थंड, स्त्राव निर्माण करणारे पदार्थ अधिक ...

अॅलर्जी allergy

Image
अॅलर्जी म्हणजे शरीराला एखादी गोष्ट न मानवणे, सात्म्य न होणे, शरीराने न स्वीकारणे. काँग्रेस गवत, निरनिराळी वेदनाशामक औषधे, टोमॅटो,मिरची, लसूण, दही, ओवा यासारखे खाद्यपदार्थ, उदबत्त्या, टायर, फटाके यांचे वास अशा नाना गोष्टींचा मानवी शरीराला त्रास होऊ शकतो. कोणाच्या उघड्या अंगावर, चेह-यावर, हातावर, छातीवर पुरळ उठतो; कोणाला दम्याचा त्रास होतो; कोणाच्या अंगाला विलक्षण खाज सुटते; कोणाला सर्दी पडसे होते; कोणाचे पोट दुखते. आयुर्वेद याचा सम्यक विचार करतो, कारणाकडे त्याच्या गुणधर्माकडे बघितले तर परिणामावर इलाज सापडतो. काही थोड्या अॅलर्जी प्रकारांचा या ब्लॉग मध्ये विचार केलेला आहे. कारणे: १) शरीराची रोगप्रतिकारक शक्ति कमी पडणे. २) काँग्रेस गवत, निरनिराळी पेट्रोल, डिझेल वा मशीनचे वापराची तेले, पेनबामचा फाजील वापर. ३) उग्र वासाच्या उदबत्त्यांचा धूर; जळणाच्या टायरचा वास, फटाक्याचे विषारी धूर इ. ४) अॅस्पिरीन, पेनिसिलीन, स्टेरॉईडस्, निरनिराळी व्हिटॅमिन्स, शरीराला नको असताना दिली जाणे. ५) ऋतुमानाप्रमाणे हवामान नसणे, गार पाणी. ६) टोमॅटो, आंबा, लसूण, मिरची, दही, दूध, आले, मीठ, लो...

दमा asthma

Image
दम्याने दमझाक झालेले दमेकरी सर्वांच्याच परिचयाचे आहेत. तोंडाला रूमाल धरलेल्या जाहिराती आपण पाहतो. ऑक्सिजनचा पंप, अॅस्थलिन, धोतन्याच्या विड्या, कनकासव, दमाकावळी, पिंपळी, धुरी, कोरफड, आश्विन पौर्णिमेला हैद्राबाद किंवा अंबरनाथ यासारख्या ठिकाणी दम्याचे औषध ; असे अनेक प्रकार दमाग्रस्तांच्या परिचयाचे आहेत. जो सुचवेल तो तो उपाय माणसे करीत असतात. श्वासविकार म्हणजे आपल्याला आपण घेत असलेल्या श्वासाची जाणीव होणे. एरवी दर क्षणाला चालणारा श्वास आपल्या नकळत चालू असतो.  या ब्लॉगवर दमा म्हणजे शास्त्रातील 'तमक श्वास' याचाच फक्त विचार आहे. शास्त्र क्षुद्र, तमक, महान इत्यादि पाच श्वासाचे दम्याचे प्रकार सांगते. ज्या विकारात माणसाला झोपावयास जमत नाही. उठून बसून रात्र काढावी लागते. कधी दिवसाही दम्याचा अॅटॅक येतो. त्याचा विचार आपण करीत आहोत. या प्रकारचा दमा हा ब-याच वेळा आनुवंशिक असतो. कधी अॅलर्जीचा; कधी सर्दी पडसे, खोकला यामुळे; कधी खराब वासामुळे, कमी अधिक श्रमाने अशी विविध कारणे दम्याची आहेत. ब-याच जणांचा दमा बहुधा उत्तर रात्री येतो. पावसाळ्यांत ऋतुसंधीच्या काळात जास्त जणांन...

टॉन्सिल्स tonsils problems

Image
टॉन्सिल्स हा अवयव मानवी शरीरातील पहिला गार्ड आहे. घशांत व पुढे धुळ किंवा अन्य कोणतेही कण व कसलेच इन्फेक्शन उतरू नये; याची काळजी टॉन्सिल्स घेते. सर्दी, पडसे, घाण हवा,थंड पदार्थ शरीरांत मानवले नाहीत म्हणजे टॉन्सिल्सला सूज येते. कान खराब होतो का नाही हेही टॉन्सिल्सवरून कळते. हा अवयव काढून टाका हे सांगणे फार सोपे आहे. त्यामुळे कांहीच्या पोटाची सोय होईल; पण बहुसंख्य मुलांची मूळ तक्रार कायमच रहाते. टॉन्सिल्स काढल्यामुळे पुढे सुद्धा मुले सुधारत नाहीत. कानाला इजा पोहोचण्याची शक्यता असेल, टॉन्सिल्स सेप्टिक झालेल्या असतील व अन्य उपायांचा कांहीच उपयोग नाही अशी खात्री असेल तरच टॉन्सिल्स काढून टाकाव्यात. टॉन्सिल्स काढण्याकरिता नसून शरीर संरक्षणाकरिता आहेत,हा विचार सतत डोळया समोर हवा. कारणे: १) खूप थंड, गोड, आंबट खारट, कफ वाढविणारे अभिष्यंदी (स्त्राव वाढविणारे) पदार्थ खाणे. २) गार वारा, थंडी, पाऊस यांचा संपर्क शरीराला सहन न होणे. ३) कांही ना काही कारणांनी लहान मुलांना सर्दी, पडसे ताप नेहमी येत जाणे. ४) चुकून विषारी किंवा घशाला न मानवणारे पदार्थ खाणे. ५) अति बोलण्याचे श्रम व...

केसांचे विकार hair problems

Image
केसांचे विकार हे खरे म्हणजे विकार नव्हेतच. केस पांढरे झाले. गळावयास लागले, म्हणजे शरीरात काही कमी अधिक बिघडते असे नव्हे, तरीपण तरुण मुलामुलींच्या दिसण्याच्या एका कल्पनेमुळे केसांना काही विलक्षण महत्त्व आजकालच्या वैद्यकात आले आहे. केस लांबसडक भरपूर, काळेभोर असावेत अशी सर्व स्त्रियांची इच्छा असते. तरुण मुलांनाही किंचित टक्कल पडणे किंवा एखादा केस पांढरा होणे हे उणेपणाचे लक्षण वाटते. ब-याच वेळा शारीरिक कारणापेक्षा हवा, पाणी यांच्यातील अपायकारक भाग, हे केस गळणे किंवा पिकण्याला कारण असतात.  आहारातील असमतोल, चिंता व चुकीचे शांपू, तेल यांमुळेही केसांची 'केस' जिंकणे म्हणजे वैद्यांची कसोटी लागत असते. केसात कोंडा असताना डोक्याला तेल चोपडून केस गळणे कधीच थांबत नाही. ज्यांना केस समस्येवर असरदार इलाज हवा आहे त्यांनी ‘डॅन्ड्रफ खरबा किंवा सोरायसिस सारखी खपल्या, खवडे इ. लक्षणांवर लक्ष द्यावे. कारणे: (१) केस गळणे (टक्कल पडणे) १) आनुवंशिकता २) तीव्र व दीर्घ मुदतीचा ताप । ३) चिंता । ४) केस धुण्याकरिता साबणाचा अतिरेकी वापर । ५) आंघोळीच्या पाण्यात दोष असणे, बोअरवेलचे पाणी, ६)...

ब्लडप्रेशर blood pressure

Image
संतर्पणोत्थ व्याधींचे म्हणून ब्लडप्रेशर व मधुमेह या विकारांकरिता आम्ही सर्वांची नीट परीक्षा, तपासणी, रक्तदाब नोंद वगैरे करून त्यांना पूर्ण आयुर्वेदीय पद्धतीची औषधे आम्ही दिली. अॅलोपॅथीची औषधे बंद केली. सांगायची गोष्ट म्हणजे बहुतांशी रुग्णांचा रक्तदाब पहिल्या आठवड्यात व एकूण पुढील महिन्यात बराच कमी झाला. सर्वांचीच औषधे सारखी होती असे नव्हे. त्यांच्या अन्य लक्षणांवरून वा इतिहासावरून कमी अधिक वेगवेगळी औषधे दिली होती.  आयुर्वेदात ब्लडप्रेशर व मधुमेहावर औषधे नाहीत असे समजणाच्या आपल्या डॉक्टर, वैद्य मित्रांना; या रुग्णांच्या अनुभवामुळे आम्हाला आत्मविश्वासपूर्वक, आधारपूर्वक आयुर्वेदाची महती पटवून देता आली. रक्तदाब हा विकार आहे का लक्षण आहे का अवस्था आहे याची सामान्य रुग्णाला बिलकुल फिकीर नसते. त्याला रक्तदाबवृद्धी किंवा क्षय; यामुळे ब्लडप्रेशर वाढणे किंवा एकदम कमी होणे या घट्पटादि चर्चा,सर्व फावल्या वेळातील तात्विक चर्चा होतात. कदाचित त्याचा उपयोग ज्ञानी माणसांना स्वत:च्या व इतरांच्या ज्ञानाला उजाळा देण्यास होत असेल. असो. रक्तदाबवृद्धी व क्षय या दोन्ही भिन्न अवस्था...

डोळ्यांचे विकार

Image
सगळीकडे 'टाईट कंपार्टमेंट सारखे शरीराचे स्पेशालिस्ट आहेत. डोळा-आय स्पेशालिस्ट, कान-इ.एन्.टी. स्पेशालिस्ट. डोळा, कान, दात हे सर्व एका शरीराचे अवयव आहेत हे मोठमोठे ज्ञानी लोक विसरतात, तेव्हा अचंबा वाटतो. रोगी डोळ्याच्या डॉक्टरकडे जातात. तेही डोळ्यांत टाकावयास औषधे व पोटात अॅन्टीबायोटिक्स देत राहतात. डोळा म्हणजे नुसता कॅमेरा नव्हे. डोळा हा सर्व धातूंचे सार आहे, अशी आयुर्वेदाची धारणा आहे. ह्रस्व दृष्टीकरिता चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स हे सर्व तंत्रज्ञानाचे काम झाले. पण नेत्रसंबंधी विकारांचा मुलभूत विचार आयुर्वेदात आहे, हे आम्ही वैद्यसुद्धा पार विसरून गेलो आहोत. डोळा म्हणजे तेजतत्व. त्याला धोका कफापासून आहे. या मुलभूत गोष्टी विसरून चालणारच नाहीत. सोबत डोळ्याची लाली, खुपच्या, खाज, रांजणवाडी, पाणी येणे, डोळे येणे, हस्वदृष्टी वाढणे, मोतीबिंदू, फूल पडणे या मर्यादित विषयापुरतीच चर्चा या ब्लॉग मध्ये  केलेली आहे. कारणे (१) डोळ्यांची लाली:  १) जागरण, उन्हांत हिंडणे, डोळे चोळणे, रडणे, चिंता, फार काळ काम करणे. २) खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण पदार्थ खाणे. ३) चहा, दही, मिरच्या,...

कानाचे विकार

Image
आयुर्वेदाच्या पांचभौतिक सिद्धांताची खरी परीक्षा कानाचे विकार बरे करताना आम्हाला येत आहे. आपले नाणे खणखणीत आहे, याची खात्री नाणे बाळगणा-याला आवश्यक असते,असो. कान हे पोकळीचे, आकाश महाभूतांचे आश्रयस्थान आहे. पृथ्वी, आप या तत्त्वांची फाजील वाढ कानाच्या यंत्रणेत झाली की कानाचे विकार होतात. त्या फाजील वाढीच्या विरुध्द गुणांची द्रव्ये वापरली असता कान वाहणे, कानाला सूज येणे, कमी ऐकू येणे हे विकार सोप्या साध्या उपायांनी बरे होतात. आजपर्यंत रुग्णांचे कान त्यांच्या कानाची प्रत्यक्ष तपासणी न करता  सुद्धा ,विकाराचा इतिहास व पांचभौतिक लक्षण ऐकून यशस्वीपणे केलेले उपचार बघून - शास्त्रसिद्धांतावर नितांत श्रद्धा ही निश्चित फलप्राप्ति देते अशी धारणा येते. कारणे १) कान वाहणे १) गार वारे, थंडी किंवा पावसात सतत भिजणे. पाण्यामध्ये खूप डुंबणे, कानास मार लागणे, उन्हातान्हांत हिंडणे, राग करणे. २) कफवर्धक थंड पदार्थ, खूप तिखट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थांचे अतिरेकी सेवन. ३) तापामध्ये तीव्र औषधे, अँटिबायोटिक्स औषधे अकारण घेणे. ४) टॉन्सिल्स (गिलायुच्या गाठी) प्रमाणाबाहेर वाढणे. २) कान दु...

उपवास Fasting

Image
भारतीय संस्कृती आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्त्व आहे. परंतु हे उपवास केवळ धर्माच्या नावावर केले जातात.  याचे आरोग्याचे दृष्टिने अधिक महत्व आहे. कारण उपवासामुळे अग्निप्रदीप्त होऊन आरोग्य टिकुन राहते. आयुर्वेदामध्ये चिकित्सेकरिता षट्कर्मे सांगितलेली आहेत.' १) लंघन २) रुक्षण ३) स्नेहन ४) बृहण ५) स्वेदन ६) स्तंभन, ह्या घटकर्मामध्ये प्रथम कर्म लंघन आहे. लंघनः यत्किंचितल्लाघवकरं देहे तल्लघनं स्मृतम् । । च.सू. २२/९ शरीरामध्ये लाघवता उत्पन्न करणाच्या क्रियेला वा द्रव्याला लंघन असे म्हणतात, पाचनान्युपवासश्च व्यायामश्चेति लंघनम् ॥ प्रकार । चतुष्प्रकारा संशुद्धिः पिपासा मारुतातपौ। च.सू.२२/१९ । वमन, विरेचन, नस्य आणि निरुह वस्ति (हे शोधनाचे चार प्रकार), पिपासा, मारुतसेवन, आतपसेवन, पाचन औषधींचे सेवन, उपवास आणि व्यायाम हे दहा प्रकार लंघनाचे वर्णिलेले आहेत. उपवास ह्या लंघनाच्या दहा प्रकारापैकी एक प्रकार आहे. उपवास हा पुण्यप्रद, आमाचे पाचन करणारा, स्फुर्ती प्रदान करणारा आणि इंद्रियप्रसादक आहे. त्याकरिता आरोग्य टिकविण्याचे दृष्टीने उपवासाला महत्...

हाडांचे विकार

Image
अलीकडे गुडघे बदलणे/खुबा बदलणे याकरिता लाखो रुपये खर्चून शस्त्रकर्म केली जातात. या स्तिथीत मोलाची भूमिका निभावणाऱ्या आयुर्वेद शास्त्राची रुग्णांनी परीक्षा घेऊन बघावी. शरीराचे धारण करणाऱ्या सात धातूतील हाडांचे विकार जरा वेगळ्या गटात बसतात. रस, मांस, मेद, मज्जा व शुक्र यांचा आधार कफ दोष हा आहे. अस्थिंचा आधार वायु असे शास्त्र सांगते.  पण वायु वाढला तर अस्थि घटतात, बिघडतात. नुसता कॅल्शियम किंवा चुना असा अस्थिविकाराचा विचार करता येत नाही. अस्थिंचे पूरण करणारी मज्जा अस्थिविकारात फार मोठा भाग घेते. कारणे: १) वातवृद्धी होईल, मजाक्षय होईल, हाडे पोकळ, ठिसूळ होतील अशी कायिक, वाचिक व मानसिक कारण परंपरा घडणे. २) अत्यंत परिश्रम, अत्यंत संक्षोभ, कोणत्याही कारणाने हाडे एकमेकावर घासली जाणे. ३) वातुळ, रुक्ष, खूप थंड, खूप तुरट, तिखट व कडू रसांच्या पदार्थांचा अतिरेक, ४) कदान्न, शिळे अन्न, हलक्या दर्जाचे अन्न दीर्घकाळ खाणे. ५) अतिमर्दन, धाप लागणे, शरीर अधिक दाबले जाणे. ६) विरुद्ध गुणांचा आहार असणे, अभिष्यंदी म्हणजे स्त्राव वाढेल असे दही, मासे, मीठ, लोणची, पापड असे पदार्थ खाणे, आ...

फिटस् येणे

Image
फिटस् म्हणजे अपस्मार किंवा एपिलिप्सी. अपस्मार म्हणजे व्यपस्मृति, किंचित काळ स्मृती नाहीशी होणे, चक्कर आल्यावर त्या काळची काहीच आठवण रुग्णाला नसते. फक्त अशा विकारालाच अपस्मार म्हणावे. फिट किंवा मिरगी किंवा झटका कसा आला? केव्हा आला? किती काळ आला? या कशाचेच भान रुग्णाला नसते. काहीच आठवत नाही. असे काही पहिल्यांदाच झाले की स्वाभाविक धावपळ होते. कांदा हुंगणे, डॉक्टर बोलावणे, गार्डिनल गोळ्या देणे, इ.इ.जी., मेंदू तपासणी इत्यादि सर्व प्रयोग सुरू होतात, ब-याच वेळा लहानपणीच या विकाराची सुरुवात होते. पालकांच्या धास्ती व अतिकाळजी करण्याने डॉक्टर्स, स्पेशालिस्टस्, गार्डिनाल, मेझोटोल, डायलेटिन, इक्वानील अशा निरनिराळ्या बँडनेम असलेल्या भरपूर गोळ्या देतात. या गोळ्या मेंदू झोपवण्याच्या असतात. झटका आल्याबरोबर प्रत्येक रुग्णाचीच दातखिळी बसणे, तोंडातून फेस येणे वगैरे गंभीर लक्षणे असतातच असे नाही, तेव्हा थोडा शांतपणे विचार करून कारणांचा विचार केला तर ‘फिट येणारा रोगी' हा कायमचा शिक्का बहुधा टळतो. झोपेच्या गोळ्यांचा कायमचा बळी वाचतो. कारणे: (१) आनुवंशिक व पूर्वजन्मातील कर्म (२) तीक्ष्...

कावीळ jaundice

Image
कावीळ म्हणजे कामला, काम म्हणजे इच्छा. इच्छेचा पूर्णपणे लय ती कावीळ,काविळीमध्ये नुसतीच भूक मंद असते असे नसून, काहीच करावेसे न वाटणे अशी दयनीय अवस्था असते ,दीर्घकाळ रोग्याला त्रास भोगावा लागतो. कावीळ हा विकार गणिताप्रमाणे नेमके कारण, नेमके स्थान, नेमका उपचार व पथ्यापथ्य असा निश्चितपणे नेमक्या कालावधीत बरा करता येतो असा आमचा विश्वास आहे. कारणे (१) सार्वदेहिक पित्त वाढल्यामुळे (बहुपित्तकामला): १) खूप तिखट, आंबट, खारट, तीक्ष्ण, उष्ण पदार्थ नियमाने खाण्यात येणे. २) जागरण, चिंता, उन्हात हिंडणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक, ३) कळत नकळत चुकीची व मोठ्या मात्रेने तीव्र औषधे व व्हिटॅमिन्स घेणे. ४) दही, गूळ, लोणचे, मिरची, पापड, मांसाहार, शिळे अन्न यांचा सातत्याने वापर. (२) पित्ताचा मार्ग अडल्यामुळे (रुद्धपथकामला): १) खराब, दूषित पाणी पिणे. २) दुधामध्ये दूषित पाणी मिसळल्यामुळे विषारी होणे. ३) कृमी किंवा जंत होणे. ४) भूक न लागणे, मंद होणे. ५) परसाकडे साफ न होणे, ६) सार्वदेहिक पित्त वाढण्याकरिता, कारण असलेली, वर सांगितलेली सर्व कारणे. लक्षणे: (१) बहुपित्तकामला:...

जंत

Image
जंत किंवा कृमी विविध प्रकारचे असतात. सुतासारख्या बारीक कृमीपासून नाकातोंडातून निघणा-या मोठ्या जंतांपर्यंत अनेक प्रकार जंत कृमींचे आहेत. काही जंत संपूर्ण बाहेर न पडता तुकड्या तुकड्याने येतात. लहान मुलांचे बाबतीत चिमटयाने नाकातोंडातून किंवा परसाकडच्या जागेतून ओढून काढावे लागतात. अनेकवेळा कोणत्याही रोगाचे कारण समजत नाही. त्यावेळेस जंताचे इतिहास असतो असे लक्षात येते. पोटदुखी,अपेंडिक्स अॅटॅक, उलटी, कठीण मलप्रवृत्ति, ताप, जुलाब, कावीळ एवढेच काय पथरी वाढणे याच्या मागे एक वा अनेक जंत कारणीभूत असू शकतात. कारणे: १) अजीर्ण झाले असताना जेवणे. २) खूप गोड, आंबट पदार्थ खाणे. ३) व्यायाम न करणे. दिवसा झोपणे. ४) घाणेरडे पाणी पिणे. ५) विरुद्ध अन्न खाणे. ६) पालेभाज्या अधिक प्रमाणात खाणे. ७) मद्य, मांस, मासे, गूळ, दूध, दही, इत्यादि पदार्थ नेहमी खाणे. ८) अस्वच्छ राहाणे. नखांत माती असणे. लक्षणे: १) भूक मंदावणे किंवा खूप भूक लागणे. २) तोडाला चव नसणे. ३) वरचेवर बारीक ताप येणे. ४) चक्कर येणे, शिरःशूल. ५) पोटात दुखणे, जुलाब होणे. ६) शौचाचे जागी, तसेच नाक खाजवणे. ७) मळमळणे...

बालरोग

Image
या ब्लॉग मध्ये  बाल म्हणजे एक वर्षापर्यंत अशी आम्ही मर्यादा घालून घेतली आहे. बालकाला पहिले चार-पाच महिने आईच्या किंवा बाहेरच्या दुधावरच बहुधा ठेवले जाते. सात महिन्यापर्यंत म्हणजेच दात यायला सुरुवात होईपर्यंत सहसा अन्न असे देत नाहीत. सातव्या महिन्यानंतर पातळ पातळ पेज, क्वचित फळ असे दिले जाते. अशा एक वर्षाच्या बालकाचा विचार करता; त्या काळात उद्भवणाच्या कफ, खोकला, जुलाब, ताप, दाताच्या तक्रारी, दूधासंबंधी तक्रारी, पडसे, पोटदुखी यांचा विचार या ब्लॉग मध्ये करीत आहोत. लहानपणापासून लहान बालकांना शक्यतो औषधे देऊ नयेत. द्यायचीच झाली तर कमीतकमी मात्रेने, गरजेपुरतीच द्यावीत. थोरथोर बालरोगतज्ञ जरी खूप टॉनिक सुचवत असली तरी; अशी औषधे टाळण्यात आपल्या बाळगोपाळांचे अंतिम हित आहे. कारणे: १) कफ - सर्दी, पडसे, थंडीवारा, गारवा, ओल असलेल्या जागेत राहणे; अशी कारणे घडणे. त्यावर वेळीच उपाययोजना न होणे, आईला कफ होणे. २) खोकला -  सर्दी, पडसे, ओल, खराब हवा यांचा संपर्क सतत येणे,आईला खोकला होणे. ३) जुलाब -  आईच्या आहारात जड पदार्थ येणे. वरचे दूध व पाणी हे जड किंवा खराब असणे, बाल...

मनोविकार mental disorders

Image
  मनाचे विकार  या वर लिहिणे अवघड आहे. मन अनाकलनीय आहे. मनाचे व्यापार वायुतत्वाने नियंत्रित आहेत. एकवेळ दारे खिडक्या लावून घरात वायूपासून संरक्षित राहता येईल. पण मनाची कवाडे बंद करून स्थिर चित्त राहणे भल्या भल्या योगीराजांनाही अवघड जाते. कारणे: १) अडखळत बोलणे: शारीरिक व्यंग असणे, जीभ आखूड असणे, चुकीच्या जागी टाका असणे, जीभ जड असणे, स्वरयंत्रात अडथळा असणे, कानात दोष असणे, आत्मविश्वासाचा अभाव, घरातील मोठ्यांचा अकारण फार मोठा धाक, वरिष्ठांचे दडपण, हस्तमैथुनामुळे ओजक्षय, कृमी, जंत किंवा पोटाच्या तक्रारीने सदैव अस्वस्थता, नपुंसकत्व, २) आत्मविश्वास नसणे: रस व रक्त, धातूवर काही कारणाने आघात होणे, दुबळेपणा येणे, कामाचा एकदम भार वाढणे, सभोवतालचे वातावरण सदैव निरुत्साही असणे, नियमित व्यायामाची पहिल्यापासून अजिबात सवय नसणे. छातीचा घेर लहान असणे. घात, अपघात याने आकस्मिक खचून जाणे, संतति नसणे, नपुंसकत्व, ३) न्यूनगंड: आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीमुळे वेळेवर वर येण्याची संधी न मिळणे. बरोबरच्या सवंगड्यांच्या प्रगतिबरोबर आपली ...

विटाळाचे विकार menstrual problems

Image
स्त्रियांच्या नेहमीच्या तक्रारी विटाळ व लठ्ठपणा या दोन विकारांशी संबंधित आहेत. वयाच्या चाळीशीच्या आसपासच्या बहुसंख्य स्त्रियांना विटाळ कमी जाणे व चरबी वाढत जाणे या दोन्ही तक्रारी हातात हात घालून त्रास देत असलेल्या दिसतात. आयुर्वेदीय ईलाज घ्यायला लागल्यापासून नुसतीच पाळी साफ येऊ लागली असे नसून, वजन घटले, काम करावयास हरुप आला ,अशी वाक्ये कानी येतात. विटाळ हा मराठी भाषेतील शब्द period, menstrual cycle, menses यासाठी वापरला जातो . तसेच संस्कृत शब्द म्हणजे आर्तव. आर्तवाचे प्रमाण हे व्यवस्थित असले म्हणजे स्त्रियांचे सर्व त-हेचे स्वास्थ्य असते. शहरी जीवनांतील कृत्रिम राहणी, अवेळी व एकांगी आहार, धावपळ, पुरुषी पद्धतीच्या जीवनाचा नाईलाजाने अंगीकार अशा विविध कारणांनी स्त्रियांना विटाळ कमी येणे; उशीरा येणे; अजिबात न येणे; नुसतेच दर्शन होणे; विटाळाचे काळी कष्ट होणे; अंगावर खूपच जाणे; विटाळास घाण वास मारणे;गांठी जाणे अशा विविध स्वरूपाच्या पीडा होत असतात. वयात आल्यानंतर वयाच्या बारा तेरा वर्षांपासून पन्नास वयापर्यंत; गर्भारपणाचा काळ सोडल्यास स्त्रीला, दर अठ्ठावीस दिवसांनी चार द...

अंगावर पांढरे जाणे White discharge

Image
महाविद्यालयातील दवाखाण्यात मध्यमवयीन किंचित् कृश अशी स्त्री हळूच आमच्या सिनियर वैद्य डॉक्टरांशी बोलू लागली की अंगावर पांढरे जात आहे अशी खात्री येत होती. तीस ते चाळीस वयाच्या दरम्यान बऱ्याच स्त्रियांना ही तक्रार असते. त्यामुळे कंबर दुखणे, दुबळेपणा व एकप्रकारचा अनुत्साह, नेहमीच आढळतो. थोडाफार वेळेवरचा उपचार, किमान औषधे, दक्षता व स्वच्छता या गोष्टी पाळल्या तर हा रोग नुसताच बरा होतो असे नाही तर कितीही कामाला स्त्री खंबीरपणे तोंड देऊ शकते. तसेच योग्य उपचारांच्या अभावी चिरकाल, दीर्घकाळ रेंगाळणारे दुखणे होऊ शकते. कारणे १) शरीरात रुक्षता किंवा वायु वाढेल असे खाणे, वागणे किंवा कुपथ्य करणे. २) ताकदीच्या बाहेर श्रम व श्रमाच्या मानाने कमी खाणे, पिणे. ३) निकृष्ट व शिळे अन्न, अपुरी विश्रांती, चिंता जागरण इ. ४) विटाळ (menses)मागेपुढे करण्याकरिता अकारण औषधे घेणे. ५) विटाळाचे काळात स्वच्छता व आवश्यक ती काळजी न घेणे. ६) पांडुता, दुबळेपणा, क्षय, कार्य असा विकारांचा इतिहास असणे. ७) तिखट, आंबट, खारट, रुक्ष, कोरडे, खूप थंड अशा पदार्थांचा जेवणामध्ये समावेश. लक्षणे १) कोणतीही ...